कंडोम्स आणि सेक्स टॉइजचे हे VIRAL PHOTO खरंच JNU गर्ल्स हॉस्टेलवर सापडले का? हे आहे तथ्य

कंडोम्स आणि सेक्स टॉइजचे हे VIRAL PHOTO खरंच JNU गर्ल्स हॉस्टेलवर सापडले का? हे आहे तथ्य

JNU च्या गर्ल्स हॉस्टेलवर सापडलेल्या वस्तू म्हणून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काय आहे या फोटोंमागचं सत्य?

  • Share this:

नवी दिल्ली, 9 जानेवारी : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU)गेल्या आठवड्यात तोंडावर रुमाल बांधून आलेल्या कथित गुंडांनी जोरदार मारहाण केली. JNU मधल्या या हिंसाचाराच्या निषेधार्थ देशभरात विद्यार्थी, कलाकार आणि सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्याच वेळी JNU च्या गर्ल्स हॉस्टेलवर (JNU girl's hostel) सापडलेल्या वस्तू म्हणून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सेक्स टॉइज, कंडोम्स असं सामान या फोटोंमध्ये दिसत आहे. हे फोटो खरंच JNU मधले आहेत का?

JNU मधल्या या 5 जानेवारीच्या हिंसाचारात अनेक विद्यार्थ्यांना लाठ्या, काठ्यांनी मारहाण करण्यात आली. तोंड झाकलेल्या हल्लेखोरांचे फोटोही व्हायरल झाले, पण या घटनेत अजूनपर्यंत दिल्ली पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही.

JNU मधले फोटो म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोंकडे बारकाईने बघून सहज सांगता येईल की हे फोटो फेक (Fake Photo)आहेत. JNU च्या कुठल्याही होस्टेलमध्ये जमिनीवर असं कार्पेट नाही. शिवाय रूम हिटरही फोटोत दिसतो आहे. त्यावरूनही हा फोटो हॉस्टेलवरचा नाही, हे सांगता येईल.

पण रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आणि हे फोटो आले कुठून याचा माग काढला असता, हे फोटो जुने असल्याचं सिद्ध झालं आहे. पहिला फोटो ऑगस्ट 2015 मधला आहे. Reddit वर एका यूजरने तो पोस्ट केला आहे. "dug through the dumpster for sex toys today" असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या यूजरने स्वतःहून रेडइट इंडियाकडे स्पष्ट केले आहेत, की JNU मधले म्हणून फिरत असलेले हे फोटो त्याचे स्वतःचे आहेत.

दुसरा फोटो आहे 2018 मधला. Google च्या रिव्हर्स इमेज सर्चचा वापर करून हे सहज लक्षात येईल की. Imgur या वेबसाईटवर पोस्ट झालेले हे फोटो आहेत. सोशल मीडियावर फिरणारे हे संदेश आणि फोटो याची खातरजमा करूनच ते पुढे पाठवायला हवेत.

सोशल मीडियावर हे फोटो अनेक जण शेअर करत आहेत. Twitter वर याला विरोधही होत आहे. पण हे फेक फोटो शेअर करून त्यावर आपल्या कमेंट्सही दिल्या जात आहेत.

दरम्यान काँग्रेसने JNU हिंसाचाराला 72 तास उलटले तरी कुणाला अटक न केल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, "आपल्या सगळ्यांना माहिती आहे या घटनेमागे कोण आहे. या गुंडागर्दीला अधिकृत मान्यता देणारे गृहमंत्रीच आहेत आमि मनुष्यबळ मंत्रालयच या सगळ्यांन पाठिशी घालत आहे."

-----------------------

अन्य बातम्या

JNUमध्ये हैदोस घालणाऱ्या 'त्या' गुंडांची ओळख पटली, करणार जेरबंद

#boycottchhapaak ट्वीटरवर ट्रेंड, दीपिका JNUमध्ये गेल्यामुळे नेटकरी भडकले

फाशी देताना दोर तुटला तर शिक्षा माफ होते का?, वाचा काय आहे नियम

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: January 9, 2020, 3:46 PM IST
Tags: fakeJNU

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading