Home /News /national /

'JNU साठी ही लाजिरवाणी बाब', आइषी घोषच्या वक्तव्यानं वीर सावरकरांवरून नवा वाद

'JNU साठी ही लाजिरवाणी बाब', आइषी घोषच्या वक्तव्यानं वीर सावरकरांवरून नवा वाद

याआधी वीर सावरकर यांच्या पुतळ्यावरून JNU मध्ये वाद झाला होता. आता पुन्हा एकदा नवीन वाद सुरू झाला आहे.

    नवी दिल्ली, 16 मार्च : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका रस्त्याला वीर सावरकरांचं नाव दिल्यानं पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. जेएनयूच्या छात्रसंघ अध्यक्ष आइषी घोषने या रस्त्याला वीर सावरकरांचं नाव दिल्यानं खळबळजनक विधान केलं आहे. तिच्या या विधानानंतर पुन्हा एकदा हा वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळत आहे. जेएनयूच्या एक्झिकेटिव्ह काऊंसिल मीटिंगमध्ये 13 नोव्हेंबर रोजी या रस्त्याचं नामकरण वीर सावरकर ठेवण्याबाबत निर्णय झाला होता. त्याच वेळी विद्यापीठात असलेल्या वसतीगृहाची फी वाढवण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. या रस्त्याच्या नामकरणासाठी अनेक दिग्गजांची नावं सुचवण्यात आली होती. मात्र मीटिंगदरम्यान वीर सावरकरांचं नाव देण्यावर एकमत झाल्यानं हे नामकरण करण्यात आलं. जेएनयू छात्रसंघाची अध्यक्ष असलेल्या आइषी घोषनं मात्र याचा विरोध केला आहे. जेएनयूमधील एका रस्त्याचं अशा पद्धतीनं नामकरण करणं ही अत्यंत शरमेची बाब असल्याचं आपल्या ट्विटरवर फोटो शेअर करत आइषीने म्हटलं आहे. 'वीर सावरकर आणि त्यांच्या समर्थकांसाठी जेएनयूमध्ये कधीही जागा नव्हती आणि नसेलही' हे वाचा-एका क्लिकवर मिळवा कोरोनाबाबत अचूक माहिती, भारताने तयार केली खास वेबसाईट याआधी वीर सावरकर यांचा पुतळा लावण्यावरून जेएनयूमध्ये मोठा गोंधळ झाला होता. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी पुतळ्याला काळं फासण्याचा प्रयत्नही केला होता. हा गोंधळ झाल्यानंतर त्यांचा पुतळा हटवण्यात आला मात्र पुन्हा एकदा जेएनयूमध्ये रस्त्याला वीर सावरकरांचं नाव दिल्यानं हा वाद उफाळून आला आहे. हे वाचा-MP त राजकीय नाट्य सुरुच.. 26 मार्चपर्यंत विधान सभेचं कामकाज स्थगित
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Delhi news, Jnusu student, V.D. Savarkar

    पुढील बातम्या