फुटीरतवादी नेता यासिन मलिकला अटक, सैन्याच्या 100 तुकड्या काश्मीरमध्ये

फुटीरतवादी नेता यासिन मलिकला अटक, सैन्याच्या 100 तुकड्या काश्मीरमध्ये

सरकारनं जम्मू - काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिकला अटक केली आहे.

  • Share this:

श्रीनगर, 23 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर आता भारतानं कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे.  हल्ल्यानंतर भारत सरकारनं फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढल्यानंतर आता जम्मू - काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिकला अटक केली आहे. फुटरतावादी उघडपणे पाकिस्तानशी संपर्क साधत असल्याचं यापूर्वी समोर आहे. पण, पुलवामा हल्ल्यानंतर मात्र सरकारनं कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे. दरम्यान, यासिन मलिकला अटक केल्यानंतर जम्मू - काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या अटकेचा निषेध केला आहे. ट्विटवरून त्यांनी आपला निषेध नोंदवला आहे.

">

शिवाय, खबरदारीचा उपाय म्हणून गृह मंत्रालयानं सैन्याच्या 100 तुकड्या देखील जम्मू - काश्मीरमध्ये तैनात केल्या आहेत. यामध्ये सीआरपीएफच्या 35, बीएसएफच्या 35, एसएसबीच्या 10 आणि आईटीबीपीच्या 10 तुकड्यांचा समावेश आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते.

फुटीरतावाद्यांचा दणका

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने प्रथम पाकिस्तानला आणि काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना दणका दिला होता. मोदी सरकारने काश्मीरमधील सर्व फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढून घेतली होती. यामध्ये हुरियत कॉन्फरन्सचा नेता मीरवाईज उमर फारुक, अब्दुल गनी बट्ट, बिलाल लोन, हाशिम कुरैशी, शब्बीर शाह शामिल यांचा समावेश होता. 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी सरकारनं फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढून घेतली होती.

LIVE VIDEO : लग्न सोहळ्यात बंदुकीने पैसे उडवण्याचा प्रयत्न, गोळी लागून डान्सरचा मृत्यू

First published: February 23, 2019, 12:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading