खळबळजनक! राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिसाने 12 लाख रुपयांत दहशतवाद्यांशी केलं डील?

खळबळजनक! राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिसाने 12 लाख रुपयांत दहशतवाद्यांशी केलं डील?

राष्ट्रपती पदकाने गौरवलेला पोलीस अधिकारीच दहशतवाद्यांना मदत करत असताना पकडण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे.

  • Share this:

श्रीनगर, 13 जानेवारी : जम्मू काश्मीर पोलिसातील एक वरिष्ठ अधिकारी दोन दहशतवाद्यांसह कारमध्ये सापडला. दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यात घेऊन जाण्याच्या आरोपाखाली त्या अधिकाऱ्याला अटक कऱण्यात आली. काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं की, हा मोठा गुन्हा आहे आणि देविंदर सिंगसोबत तसंच वागलं जाईल जसं दहशतवाद्यांसोबत वागतात. सुरक्षा संस्था त्यांची चौकशी करत आहेत.

हिजबुलच्या दहशतवाद्यांसोबत पकडण्यात आलेल्या पोलिस अधिकारी दविंदर सिंगबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवादी आणि सिंग यांच्यात 12 लाख रुपयांचे डील झाल्याचे सांगण्यात य़ेत आहे. काश्मीरमधील कुलगाम इथं अटक केल्यानंतर डीएसपी सिंगची चौकशी सुरू आहे. 12 लाख रुपयांच्या बदल्यात दविंदर सिंग दहशतवाद्यांना सुरक्षित चंदीगढला पोहचवणार होता. त्यासाठी त्याने चार दिवसांची सुट्टी घेतली होती असे वृत्त दैनिक जागरणने दिलं आहे.

विजय कुमार म्हणाले की, तो ड्यूटीवर होता आणि आम्ही त्याला कसे थांबवू शकतो. कारण त्याच्याबद्दल आमच्याकडे कोणत्याही प्रकारची ठोस माहिती नव्हती. या पोलिस अधिकाऱ्याची संसद हल्ल्यात काही भूमिका होती का याबाबत कोणतं रेकॉर्ड नाही. पण याची चौकशी होईल. आतापर्यंत झालेल्या चौकशीबद्दल सांगण्यास विजय कुमार यांनी नकार दिला. ते म्हणाले की दक्षिण काश्मीरमध्ये जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून शनिवारी त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर काही दहशतवादी शोपियामधून पळून गेले.

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक नाबीद हा याआधी पोलिस कॉन्स्टेबल होता. त्याने हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये जाण्यासाठी 2017 मध्ये नोकरी सोडली होती. त्याच्यावर पोलिस कर्मचारी आणि नागरिकाच्या हत्येचाही आरोप आहे. डीएसपी सिंग यांनी दहशतवादविरोधी कारवायांमध्ये काम केलं आहे. मात्र, त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा ते दहशतवाद्यांना घेऊन जम्मूकडे कारने जात होते. हा एक मोठा गुन्हा आहे त्यामुळे दहशतवाद्यांप्रमाणेच त्याला वागणूक दिली जाईल असंही विजय कुमार म्हणले.

राष्ट्रपती पदक विजेता पोलीस उप अधीक्षकच करत होता काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत

कुमार यांनी सांगितलं की, आम्ही सुरक्षा दल आणि संस्थांना चौकशीसाठी बोलावलं आहे. दहशतवाद्यांची ओळख पटली असून 2017 मध्ये पोलिस कॉन्स्टेबल असलेला नाबीद बडगाममधून चार रायफल घेऊन फरार झाला होता. त्याच्याविरुद्ध 17 गुन्हे नोंद आहेत. शोपिया जिल्ह्यात कमांडर आहे.

मुंबईकडे येणाऱ्या विमानातच महिलेची बॉम्बस्फोटाची धमकी, पायलटला दिली चिठ्ठी

डीएसपी दहशतावाद्यांना बाहेर जाण्यासाठी मदत करत होता. त्या डीएसपीच्या मदतीने दहशतवादी दिल्लीत येण्याच्या तयारीत होते. दहशतवाद्यांसोबत डीएसपी सापडताच त्याच्या घरीही छापा टाकण्यात आला. यामध्ये 5 ग्रेनेड, 3 एके-47 असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. डीएसपीला दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याची मोहिम दक्षिण काश्मीरचे डीआयजी अतुल गोयल यांच्या नेतृत्वाखाली झाली.

डीएसपी सिंग श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्यूटीसाठी होते. त्यांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाया केल्यामुळे डीएसपी पदावर बढती देण्यात आली होती. गेल्या वर्षी 15 ऑगस्टला राष्ट्रपती पदकानेही त्यांचा गौरव करण्यात आला होता.

ऐकावं ते नवलच! नवरा रोज 7 तास अंघोळ करतो म्हणून बायकोनं दिला घटस्फोट

Published by: Suraj Yadav
First published: January 13, 2020, 8:13 AM IST
Tags: Jammu

ताज्या बातम्या