Elec-widget

जिओ मोबाईलचं बुकिंग आजपासून, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जिओ मोबाईलचं बुकिंग आजपासून, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हा फोर जी फोन अक्षरश: शून्य रुपयात म्हणजेच दीड हजार रुपयांच्या रिफंडेबल सिक्युरीटी डिपॉझिटवर विकत मिळेल .

  • Share this:

24 आॅगस्ट : बहुप्रतिक्षित रिलायन्स जिओ मोबाईलसाठीची पूर्वनोंदणी आजपासून सुरू होणार आहे. 500 रुपयांमध्ये फोनसाठी पूर्वनोंदणी करता येणार आहे.

जिओ अॅप आणि वेबसाईटवरही ही नोंदणी करता येईल .

या फोनची पूर्वनोंदणी जवळच्या जिओ रिटेलर केंद्रातही करता येणार आहे. हा फोर जी फोन अक्षरश: शून्य रुपयात म्हणजेच दीड हजार रुपयांच्या रिफंडेबल सिक्युरीटी डिपॉझिटवर विकत मिळेल .

कसा करायचा फोन बुक ?

www.jio.com या वेबसाईटवरुन प्री-बुकिंग करताना, होम पेजच्या जिओ स्मार्टफोनच्या बॅनरवर Keep me posted वर क्लिक करायचं,क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशन पेज येईल

Loading...

नंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाईप केल्यावर तुमचं रजिस्ट्रेशन होईल.

-रजिस्ट्रेशन कंम्प्लिट झालेला मेसेज तुम्हाला मोबाईलनवर येईल आणि अशाप्रकारे तुम्ही जिओफोन बुक करू शकता.

जिओफोन बुक कुठे करु शकता ?

जिओची वेबसाईट, माय जियो अॅप, आणि रिलायन्स जिओ स्टोअरमध्ये तुम्ही या फोनसाठी प्री-बुकिंग करु शकता.

जियोफोन बुक करताना कोणची कागदपत्र आवश्यक ?

जियोफोनचं बुकिंग करताना तुम्हाला अधिकृत जिओ रिटेलरला तुमचं आधार कार्डची फोटो कॉपी द्यावी लागेल आणि तीच फोटोकॉपी तुम्हाला रिलायन्स जिओच्या आउटलेटमध्ये सुद्धा द्यावी लागेल. आतातरी एक व्यक्ती एक आधारकार्डवर एक जिओफोन बुक करु शकतो...म्हणजेच आधारकार्ड लिंक झाल्यावर तुमची सगळी माहिती सॉफ्टवेअरवर अपलोड होईल आणि त्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर मिळेल. हा तोच टोकन नंबर तुम्हाला फोन विकत घेतानाही सांगावा लागेल.

​जियोफोन वितरित कधी केला जाईल किंवा हातात केव्हा मिळेल?

25 ऑगस्टला प्री-बुकिंग केल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिओफोनचं वितरण होण्याची शक्यता आहे. मात्र जर प्री-बुकिंग जास्त असेल तर वितरणाची तारिख पुढे जाऊ शकते,

जिओफोनची किंमत

रिलायंस इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी 21 जुलैला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जियोफोनचं अनावरण केलं होतं. आणि जियोफोनची किंमत शून्य असेल असं देखील जाहीर केलं होतं. फक्त सुरुवातीला म्हणजेच हॅन्डसेट मिळाल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव 1500 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे आणि ती रक्कम तुम्हाला 36महिन्यांनी परत देखील मिळणार आहे.

काय आहेत स्मार्ट जिओ फिचरफोनचे फिचर्स?

- अल्फा न्युमेरिक की-पॅड

- 2.4'' QVGA डिस्प्ले

- FM रेडिओ

- टॉर्च लाईट

- हेडफोन जॅक

- SD कार्ड स्लॉट

- बॅटरी, चार्जर

- 4 वे नेव्हिगेशन सिस्टिम

- फोन कॉन्टॅक्ट बुक

- कॉल हिस्ट्री फॅसिलिटी

- जिओ अॅप्स

- मायक्रोफोन आणि स्पीकर

- भारतातल्या 24 भाषांना हा 4G LTE फोन सपोर्ट करेल.

- जिओ अॅप्लिकेशन्स, जिओ सिनेमा, जिओ म्युझिक यात असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2017 12:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...