IUC चार्जेस म्हणजे काय? JIO चं फ्री कॉल बंद झाल्यामागे आहे हे कारण

IUC चार्जेस म्हणजे काय? JIO चं फ्री कॉल बंद झाल्यामागे आहे हे कारण

10 ऑक्टोबरपासून जिओच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल्ससाठी IUC रिचार्ज व्हाउचर्स घ्यावी लागणार आहेत. प्रत्येक 10 रुपयांच्या रिचार्जवर 1 GB डेटा फ्री मिळणार आहे. पण ज्यामुळे फ्री कॉलिंग बंद झालं ते IUC आहे तरी काय?

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : रिलायन्स जिओने Jio आजपासून फ्री आउटगोइंग कॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Relaince JIO जिओ नेटवर्कवरून दुसऱ्या कुठल्याही इतर मोबाईल नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या फोनला आता 6 पैसे प्रतिमिनिट एवढं शुल्क लागणार आहे. 10 ऑक्टोबरपासून जिओच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल्ससाठी IUC रिचार्ज व्हाउचर्स घ्यावी लागणार आहेत. प्रत्येक 10 रुपयांच्या रिचार्जवर 1 GB डेटा फ्री मिळणार आहे.  रिलायन्स जिओच्या वतीने ही शुल्कवाढ नसून IUC चार्जेसची वसुली असल्याचं म्हटलं आहे. हे IUC चार्ज म्हणजे काय?

  • इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC) म्हणजे एका मोबाईल नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कमधल्या मोबाईलला कनेक्ट करण्यासाठीचं शुल्क.
  • देशभरात IUC चा दर सारखाच असावा यासाठी TRAI टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया  आग्रही आहे.
  • TRAI ट्रायने ठरवल्यानुसार सध्या IUC चा दर 6 पैसे प्रतिमिनिट इतका आहे. तोच रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता आउटगोइंग कॉल्ससाठी द्यावा लागणार आहे.
  • गेल्या तीन वर्षांत जिओने IUC साठी इतर मोबाईल कंपन्यांना 13 हजार 500 कोटी रुपये मोजले आहेत.
  • IUC शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा TRAI चा आग्रह आहे. त्यानुसार प्राधिकरणाने सर्व मोबाईल कंपन्यांना सूचनाही केल्या आहेत.
  • IUC पूर्ण रद्द करण्याची शेवटची मुदत 1 जानेवारी 2020 आहे. त्याअगोदर हे दर बंद होणं अपेक्षित आहे.
  • Jio  ने दिलेल्या माहितीनुसार, आउटगोइंग कॉल्सला लावलं जाणारं शुल्क हे IUC मुळे आहे. त्यामुळे IUC बंद होईल त्यादिवशी पुन्हा एकदा जिओचे सर्व कॉल्स फ्री होतील.

10 ऑक्टोबरनंतर काय असेल फ्री?

  • जिओ टू जिओ फोन
  • जिओ टू लँडलाइन फोन
  • जिओवरून दुसऱ्या नेटवर्कच्या मोबाईलवर केल्या जाणाऱ्या फोनला 6 पैसे मिनिट या दराने शुल्क द्यावं लागेल.

फ्री कॉलिंगची सुविधा दिल्यामुळे देशभरात मोबाईल क्रांती आणणाऱ्या Rilance Jio रिलायन्स जिओने त्यांच्या धोरणात मोठा बदल केला आहे.

वाचा - Amazon, Flipkartसह ई कॉमर्स कंपन्यांनी 6 दिवसांत विकलं 21 हजार कोटींचं सामान

Jio जिओ फोनवरून दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल फोनवर कॉल करण्यासाठी  हे पैसे पडणार आहेत.  रिलायन्स जिओची सेवा आता पूर्णपणे मोफत मिळणार नसल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC)ग्राहकांकडून वसून करण्यासाठी धोरणामध्ये हा बदल करण्यात आला आहे.

Jio नेटवर्कवर मोफत कॉलिंग आणि 2G नेटवर्क असल्याने अन्य मोबाईल कंपन्यांचे ग्राहक जिओ ग्राहकांना मिस्ड कॉल देतात आणि जिओवरून मग फुकट कॉल केला जातो, असं जिओचं म्हणणं आहे. Airtel आणि Vodafone-Idea चे 35 ते 40 कोटी 2G ग्राहक रिलायन्स जिओ नेटवर्कवर दररोज किमान 25 ते 30 कोटी missed call देतात, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. इतर कंपन्यांना जिओ यासाठी 13500 कोटी रुपये मोजत आहे.

जिओ ग्राहकांना केलेलं (Jio to Jio free) कॉलिंग मात्र पूर्वीसारखं मोफत असणार आहे. आउटगोइंगवरचे 6 पैसे प्रतिमिनिट हे शुल्क तात्पुरत्या स्वरूपाचं आहे, हे स्पष्ट करताना जिओने सांगितलं की, TRAI ने सांगितलेली टर्मिनेशन चार्जेस व्यवस्था लागू होत नाही, तोवर हे शुल्क लागेल. 1 जानेवारी 2020 पासून हे IUC बंद होणार असल्याची माहिती आहे.

अन्य बातम्या :

बाहेर फिरायला जाताना ऑनलाइन बुकिंग करताय का? तर या मायाजाळाबद्दल एकदा जाणून घ्या

महायुतीत फूट, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारासह 28 नेत्यांचा राजीनामा

वाचा - मंदीचं अजब वास्तव! नॅनो 9 महिन्यात 1 तर मर्सिडीजची विक्री मात्र एका दिवसात 200

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: JIOmobile
First Published: Oct 9, 2019 07:47 PM IST

ताज्या बातम्या