पत्नीच्या हौस पूर्ण करण्याच्या नादात पती लागला भीकेला, वाद पोहोचला कोर्टात

पत्नीच्या हौस पूर्ण करण्याच्या नादात पती लागला भीकेला, वाद पोहोचला कोर्टात

पत्नीची हौसमौज पूर्ण करण्याच्या नादात रस्त्यावर येण्याची वेळ एका पतीवर आली आहे.

  • Share this:

रांची, 3 सप्टेंबर : पत्नीची हौसमौज पूर्ण करण्याच्या नादात रस्त्यावर येण्याची वेळ एका पतीवर आली आहे. हौस जोपर्यंत भागवली जात होती तोपर्यंत या दाम्पत्यामध्ये सर्व काही ठीक होतं, पण पत्नीच्या इच्छा पूर्ण करणं नवऱ्यानं थांबवल्यानंतर महिलेनं थेट कोर्टात धाव घेतल्याचं विचित्र प्रकरण समोर आलं आहे. इतकंच नाही तर पतीकडून Maintenance allowance मिळावा या मागणीसाठी पत्नीकडून कौटुंबिक न्यायालयात खटला देखील दाखल केला. झारखंडची राजधानी रांची येथील कौटुंबिक न्यायालयातील हे अजबगजब प्रकरण समोर आलं आहे.

पत्नीच्या हौसमौजनं लावलं भीकेला

पत्नीच्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादात एका पतीला नको-नको त्या गोष्टींचा सामना करावा लागला आहे. अमितनं (बदललेलं नाव) 2004मध्ये कुटुंबीयांच्या सहमतीनं प्रेयसी अर्चना (बदललेलं नाव) सोबत लग्न केलं. काही वर्षांनंतर या दोघांनी एका बाळालाही जन्म दिला. पण पत्नी अर्चनाची महगाडे कपडे वापरण्याची सवय, मोठ-मोठ्या हॉटेल्समध्ये जेवण करण्याच्या हौसेमुळं अमितवर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. अमितनं पत्नीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गेल्या 8 ते 9 वर्षांमध्ये तब्बल 23 लाख रुपयांचं कर्ज घेतलं. कर्जबाजारी झाल्यानं अमित तणावात देखील होता आणि यामुळे त्याची नोकरीसुद्धा गेली.

(वाचा : मुंबईसह उपनगर, ठाणे परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू, सखल भागांत साचलं पाणी)

जेव्हा अमितनं पत्नीला तिच्या इच्छा आता पूर्ण करू शकत नाही, असं सांगितलं त्यावेळेस दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. अमित आधी आमच्या सर्व सुखसोयींकडे लक्ष देत होता तर मग आता त्या पूर्ण का होऊ शकत नाहीत? असा भलताच सवाल अर्चनानं उपस्थित केला आहे.

(वाचा : सावधान! राज्यात पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा)

पत्नीच्या हौसेपायी विकली संपत्ती

मिळालेल्या माहितीनुसार, धक्कादायक बाब म्हणजे अमितने पत्नीची आवड पूर्ण करण्यासाठी आपली वडिलोपार्जीत संपत्तीदेखील विकली. त्यानं 70 लाख रुपयांचं स्वतःचं राहतं घरीदेखील विकलं. यातील 47 लाख त्यानं पत्नीवर खर्च केले. तरीही अर्चनाचे अवास्तव शौक काही पूर्ण होईनात. अखरे अमितनं तिच्यासमोर हात टेकले. यानंतर मात्र त्या दोघांच्या नात्यात अंतर निर्माण झालं आणि प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं.

VIDEO: उरणच्या ओएनजीसी प्लांटमध्ये भीषण अग्नितांडव! नागरिकांमध्ये भीती

Published by: Akshay Shitole
First published: September 3, 2019, 9:14 AM IST

ताज्या बातम्या