मराठी बातम्या /बातम्या /देश /

जिममध्ये व्यायाम करताना कोसळला तरूण, जागीच झाला मृत्यू

जिममध्ये व्यायाम करताना कोसळला तरूण, जागीच झाला मृत्यू

जिममध्ये व्यायाम करत असताना ( exercising in gym)अचानक तरूणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  Onkar Danke

मुंबई, 25 जून : जिममध्ये व्यायाम करत असताना ( exercising in gym)अचानक तरूणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पपलू दीक्षित असं या तरूणाचं नाव असून ते 37 वर्षांचे होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते नियमितपणे जिम करत, होते. सकाळी नेहमीप्रमाणे व्यायाम करत असताना त्यांचा मृत्यू झाला.

झारखंडमधील पलामूमधील ही धक्कादायक घटना आहे. पपलू हे येथील मोदीनगर सेंट्रल जेलमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होते. गुरूवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे जिममध्ये गेले. सुमारे अर्धा तास वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम केल्यानंतर वजन उचलताना ते बेशुद्ध झाले. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या अन्य मंडळींनी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी टाकून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण, पपलूंवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यानंतर त्यांना तातडीनं उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला.

कोलेस्ट्रॉल-ब्लॉकेज होण्यापूर्वीच समजून घ्या सॅच्युरेटेड फॅट कशात असतात; निरोगी राहाल

पपलू सतत वर्कआऊट करत होते. त्या दरम्यान वजन उचलताना ते थोडावेळ थांबले आणि त्यानंतर काही सेकंदामध्येच अचानक खाली पडले, अशी माहिती या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. पोलिस आणि कुटुंबीयांना अद्याप तो रिपोर्ट मिळालेला नाही, अशी माहिती आहे. पपलू यांचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाला असावा अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Jharkhand