VIDEO झारखंडमध्ये नरेंद्र मोदींना धक्का देणारा नेता घेतोय सायकलचा आनंद

VIDEO झारखंडमध्ये नरेंद्र मोदींना धक्का देणारा नेता घेतोय सायकलचा आनंद

निकाल येत गेले आणि त्यांचा ताण निवळला. निकाल जस जसे येत गेले तसं JMMमध्ये कधी आनंद तर तणाव होता.

  • Share this:

रांची 23 डिसेंबर : झारखंडमध्ये प्रादेशिक पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाने (JMM) भाजपला जोरदार धक्का दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि भाजपचे सर्व दिग्गज नेते प्रचारात उतरले होते. या सर्वांना टक्कर देत JMMचे नेते हेमंत सोरेन यांनी कमाल केलीय. विधानसभा निकालात सर्वाधिक जागा मिळवून JMM काँग्रेस आणि आरजेडी सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. निकाल जसे येत होते तसे भाजपच्या गोटात सामसूम होती तर काँग्रस आणि JMM च्या गोटात आनंद होता. JMMचे नेते हेमंत सोरेन हे त्यांचे वडिल शिबू सोरेन यांच्यासोबत घरीच निकाल बघत होते. निकाल येत गेले आणि त्यांचा ताण निवळला. निकाल जस जसे येत गेले तसं JMMमध्ये कधी आनंद तर तणाव होता. JMMला जेव्हा उत्तम बढत मिळाली ते हेमंत सोरेन यांच्या चेहेऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. काही वेळानंतर तर त्यांनी घराच्या आवारात सायकल चालविण्याचाही आनंद घेतला. त्यावेळी सगळ्यांनाच हेमंत सोरेन यांना या रुपात बघून आनंद झाला.

'चाचा जान' एका रात्रीत झाले Rockstar; लतादीदींच्या गाण्यावर धरला ठेका, VIDEO VIR

झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्यावर निवडणूक प्रचारात अनेक आरोप झाले होते. तसंच मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल काही निर्णय वादात सापडले होते. त्यांच्या एकंदरीत कारकीर्दीबाबत तिथली जनता फार समाधानी नसल्याचं दिसून आलं होतं. त्यातच जमशेदपूर मतदारसंघात भाजपच्याच सरयू रॉय यांनी बंडखोरी केल्याने रघुबर दास यांच्या अडचणी वाढल्या होत्या. या सगळ्याचा परिपाक म्हणून या मतदारसंघात रघुबर दास हे या जागेवरून पिछाडीवर पडले आहेत.

राष्ट्रवादीसाठी झारखंडमधून आनंदाची बातमी

काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत सुरू असताना झारखंडमधून राष्ट्रवादी काँग्रेससाठीही एक दिलासा देणारी बातमी आली आहे. झारखंडमधील एका मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार पुढे असल्याची माहिती आहे. हुसेनाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार कमलेश कुमार सिंह यांनी आघाडी घेतली आहे. या जागेवरचा निकाल अद्याप स्पष्ट झाला नसला तरीही सुरुवातीला हाती आलेल्या कलानुसार राष्ट्रवादीचे कमलेश कुमार सिंह हे आघाडीवर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2019 05:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading