Home /News /national /

लॉकडाऊनमध्ये तरुणाला बळावला विचित्र आजार; एकाच ठिकाणी कित्येक तास मूर्तीसारखा राहतो उभा

लॉकडाऊनमध्ये तरुणाला बळावला विचित्र आजार; एकाच ठिकाणी कित्येक तास मूर्तीसारखा राहतो उभा

कोरोना लॉकडाऊनमुळे (corona lockdown) व्यवसाय ठप्प झाल्याने तरुणाला मानसिक आजाराने ग्रासलं आहे.

    विकास कुमार/रांची, 22 जून : कोरोना लॉकडाऊनचा फटका अनेकांना बसला आहे. आर्थिक चणचण, व्यवसाय ठप्प झाला, काम सुटलं अशा बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या सर्वांचा परिणाम आणि घरात राहून राहून लोकांना मानसिक आजारांनीही ग्रासलं आहे. असाच एक विचित्र मानसिक आजार बळावला आहे तो झारखंडमधील (jharkhand) एका तरुणाला. एकाच ठिकाणी कित्येक तास हा तरुण मूर्तीसारखा उभा राहतो. सरायकेला जिल्ह्यातील मुडिया पारा गावातील हेमंत कुमार मोदक. राजनगरच्या साहू कॉलनीत त्याची इलेक्ट्रॉनिक्सचं छोटंसं दुकान होतं. तिथं तो इलेक्ट्रॉनिक्सच्या काही वस्तू विकायचा आणि रिपेअरिंगचं कामही करायचा. या दुकानात कमावलेल्या पैशांतून त्याचं घर चालायचं, कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. मात्र कोरोनाच्या महासाथीत लॉकडाऊनमुळे त्याचं दुकान बंद झालं आणि त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलं. घर कसं चालवायचं असा प्रश्न त्याला पडला, भविष्यात कसं होईल याची चिंता त्याला सतावू लागली. तो इतकी चिंता करू लागला की त्याला मानसिक आजाराने ग्रासलं. हे वाचा - पुण्यात पुन्हा खळबळ, KEM रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारत महिलेने केली आत्महत्या दोन महिन्यांपासून त्याची मानसिक परिस्थिती हळूहळू बिघडू लागली. सुरुवातीला तो विचित्र वागू लागला. मात्र आता तर तो फक्त आणि फक्त उभं राहू लागला. कित्येक तास तो एकाच ठिकाणी एखाद्या मूर्तीसारखा उभा राहतो. ना ऊन लागत, ना भूक, ना तहान. सतत असं उभं राहिल्याने त्याच्या पायांना सूज आली आहे. स्थानिक लोकांनी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला मात्र काहीच फायदा झाला नाही. हेमंत आई-वडीलांचा एकुलता एक मुलगा. आपल्या वृद्ध आई-वडीलांचा तो एकमेव आधार. आपल्या एकुलत्या एक मुलाची अशी अवस्था पाहून त्याच्या आई-वडीलांना काय वेदना होत असतील याची कल्पना आपण करूच शकतो. त्यांच्याकडे इतके पैसेही नाहीत की आपल्या मुलाचा ते उपचार करून घेतील. हे वाचा - लॉकडाउनच्या काळात 'हे' रुग्ण झाले कमी, नवी माहिती समोर दरम्यान जिल्हा आरोग्य विभागाने हेमंतची दखल घेतली आहे आणि त्याच्यावर उपचार करू असं आश्वासन दिलं आहे. याबाबत माहिती देताना सिव्हिल सर्जन डॉ. हिमांशू भूषण बरवार यांनी सांगितलं, "राजनगर सीएचसी प्रभारीद्वारे या तरुणाला पाहण्यात आलं आहे. त्याला सिजिओफ्रेमिक मेंटल डिसॉर्डर हा आजार आहे. त्याला उपचारासाठी रांचीत पाठवलं जाईल. एक-दोन दिवसात कोविड टेस्ट झाल्यानंतर त्याला उपचारासाठी तिथं पाठवलं जाईल" संपादन - प्रिया लाड
    First published:

    Tags: Coronavirus, Jharkhand, Lockdown, Mental health

    पुढील बातम्या