धक्कादायक! नोकरी जाण्याच्या नैराश्यात भाजप नेत्याच्या मुलाची आत्महत्या

नोकरी जाण्याच्या नैराश्यात भाजप नेत्याच्या मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2019 01:09 PM IST

धक्कादायक! नोकरी जाण्याच्या नैराश्यात भाजप नेत्याच्या मुलाची आत्महत्या

रांची, 19 ऑगस्ट : नोकरी जाण्याच्या नैराश्यात भाजप नेत्याच्या मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पण यानंतर जे काही घडलं ते अमानवीय होतं. या घटनेत सरकारी हॉस्पिटल प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. भाजपचे नेते विश्वजीत यांना मुलगा आशिषचा मृतदेह पोस्टमार्टेमच्या खोलीपर्यंत नेण्यासाठी त्यांना स्ट्रेचरदेखील मिळालं नाही. त्यांना अक्षरशः मुलाचा मृतदेह एका चादरीत गुंडाळून रुमपर्यंत न्यावा लागला. झारखंडच्या जमशेदपूर येथील एमजीएम या सरकारी हॉस्पिटलमधील ही संतापजनक घटना आहे. विश्वजीत यांनी सांगितलं की, 'माझा मुलगा नोकरी जाण्याच्या नैराश्यात होता. कंपनी अन्य मित्रांप्रमाणे आपल्यालाही कामावरून काढेल, याची भीती त्याला होती'.

(वाचा : पुण्यात 8 वर्षाच्या मुलीला वडिलांनी गळा दाबून मारलं, नंतर केली आत्महत्या)

मुलाचा मृतदेह चादरीत गुंडाळावा लागला

भाजप नेते विश्वजीत यांना मुलगा आशिषचा मृतदेह पोस्टमार्टेम रुमपर्यंत न्यायला स्‍ट्रेचर मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण त्यांना स्ट्रेचर काही मिळालं नाही. अखेर त्यांनी मुलाचा मृतदेह चादरीत गुंडाळला आणि रुमपर्यंत नेला. एवढंच नाही तर आशिषचा मृतदेह नेण्यासाठी हॉस्पिटलकडून अ‍ॅम्ब्युलन्सदेखील पाठवण्यात आली नाही. त्याच्या कुटुंबीयांनी अ‍ॅम्ब्युलन्ससाठी जवळपास 40 मिनिटं वाट पाहिली. अखेर त्याचा मृतदेह पिकअप व्हॅननं पोस्टमार्टेम रुमपर्यत न्यावा लागला.

दरम्यान, शनिवारी संध्याकाळी पोस्टमार्टेमनंतर आशिषच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.

Loading...

(वाचा : मुंबईत भावाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, आईकडून देहविक्रीसाठी जबरदस्ती)

VIDEO: 'मोदी हिटलर, 56 इंचाची छाती असणारे राज ठाकरेंना घाबरले'; मनसेचा हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BJPsuicide
First Published: Aug 19, 2019 01:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...