झारखंड, 06 जुलै : छपरा इथं एका खाजगी शाळेत एका विद्यार्थिनीसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणी आता धक्कदायक माहिती समोर आली असून या दृश्ककृत्यात आरोपींना विद्यालयाच्या प्राचार्य आणि शिक्षकांनीच मदत केल्याची बाबसमोर आलीये.
2017 मध्ये दिपेश्वर शाळेत एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींवर शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर या आरोपी विद्यार्थ्यांनी पीडित मुलीला ब्लॅकमेलिंग सुरू केले होते. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी विद्यार्थ्यांच्या या कृत्यात शिक्षकही सहभागी झाले. या नराधम शिक्षकांनी एक एक करून 18 जणांनी पीडित मुलीवर अत्याचार केला.
या प्रकरणात शाळेचा मुख्याध्यापक, दोन शिक्षकांसह 18 जण सहभागी होते. या पैकी मुख्याध्यापकासह 4 आरोपींना अटक करण्यात आली असून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
हेही वाचा