झारखंडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, अधिकाऱ्यासह 6 जवान शहीद Jharkhand | Saraikela district | Maoist Attack

झारखंडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, अधिकाऱ्यासह 6 जवान शहीद Jharkhand | Saraikela district | Maoist Attack

झारखंडमध्ये माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका पोलिस अधिकाऱ्यासह 6 जवान शहीद झाले आहेत.

  • Share this:

सराईकेला, 14 जून: झारखंडमध्ये माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका पोलिस अधिकाऱ्यासह 6 जवान शहीद झाले आहेत. झारखंडमधील सराईकेला येथील कुकडहाटच्या आठवडी बाजारात माओवाद्यांनी हल्ला केल्याचे प्राथिमिक वृत्त आहे. या हल्ल्यासंदर्भात अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आठवडी बाजारात बंदोबस्तासाठी जाऊन परत येताना दबा धरुण बसलेल्या माओवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. सराईकेला येथे आठवडी बाजार सुरू असताना मोटरसायकरवरून आलेल्या माओवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात सहा पोलिस शहीद झाले. हल्ल्यानंतर माओवाद्यांनी पोलिसांची शस्त्रे देखील पळवून नेली.

VIDEO : व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची उदयनराजेंकडून नक्कल, दाखवला आपला मोबाईल!

Tags: jharkhand
First Published: Jun 14, 2019 08:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading