Home /News /national /

लालू प्रसाद यादव यांच्या बेडरुमला लागली आग, सगळीकडे एकच गोंधळ

लालू प्रसाद यादव यांच्या बेडरुमला लागली आग, सगळीकडे एकच गोंधळ

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Former Bihar Chief Minister Lalu Prasad Yadav) यांच्या बेडरुमला आग लागल्याचं वृत्त आहे.

  झारखंड, 07 जून: झारखंडमध्ये (Jharkhand) तीन दिवसांच्या मुक्कामावर आलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Former Bihar Chief Minister Lalu Prasad Yadav) यांच्या बेडरुमला आग लागल्याचं वृत्त आहे. पलामू येथील सर्किट हाऊसमध्ये त्यांच्या खोलीत भिंतीला लावलेल्या पंख्यामध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली. त्यामुळे उपस्थित लोकांमध्ये घबराट पसरली होती. दरम्यान आरजेडी सुप्रीमो सुरक्षित आहेत. लालूंच्या खोलीत आग लागली तेव्हा लालू डायनिंग हॉलमध्ये वर्तमानपत्र वाचत होते, असे सांगण्यात आले. आगीची माहिती मिळताच सर्किट हाऊसमधील कर्मचाऱ्यांनी तात्काळ कार्यभार स्वीकारला. तेथील वीज कनेक्शन तोडून परिस्थिती हाताळण्यात आली. सिद्धू मुसेवालांवर गोळ्या झाडणाऱ्या 8 शूटर्सची ओळख पटली, फोटो आणि नावं समोर आदल्या दिवशी लालू प्रसाद यादव बिहारहून झारखंडला पोहोचले आहेत. येथे ते 8 जून रोजी पलामूच्या न्यायालयात त्याच्याविरुद्ध आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी हजर राहणार आहे. हे प्रकरण निवडणूक प्रचारादरम्यान सभेच्या ठिकाणी परवानगीशिवाय हेलिकॉप्टर उतरवण्याबाबतचे आहे. या प्रकरणी न्यायालयाने लालूंना हजर राहण्याची शेवटची नोटीस दिली होती. येथे मंगळवारीही लालूंना भेटण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. सकाळपासून सर्किट हाऊसमध्ये गोंधळ सुरू आहे. येथे येणारे बहुतांश लोक लालूप्रसाद यांचा आशीर्वाद घेत आहेत. लालू यादव यांच्या खोलीत आग लागली
  • आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या खोलीत आग लागली
  • लालूंना नुकसान नाही
  • लालू यादव यांचा मुक्काम पलामू सर्किट हाऊसमध्ये आहे
  • खोलीच्या पंख्याला आग लागली
  • वीजपुरवठा खंडित करून आग आटोक्यात आणण्यात आली
  • सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली
  • त्यावेळी लालू डायनिंग हॉलमध्ये होते.
  • लालू यादव सोमवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून पलामू सर्किट हाऊसमध्ये मुक्कामी आहेत.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Bihar

  पुढील बातम्या