लोहरदगा (झारखंड), 09 ऑगस्ट: झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. येथील एका एका स्मशानभूमीत अज्ञातांनी एका नवजात बाळाला जिवंत पुरले. मात्र रात्री अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि बाळाचे प्राण वाचले. सध्या हे नवजात सुरक्षित असून, येथील एका कुटुंबाच्या घरी आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कुरू पोलिस स्टेशन परिसरातील आहे. येथील चंदलासो धरणाजवळील स्मशानभूमीत शनिवारी सायंकाळी एक जिवंत नवजात बाळाला पुरण्यात आले. नवजात बाळाला दफन केल्याची माहिती मिळताच जवळपासचे गावकरी एकत्र आले.
वाचा-दोघेही होते कट्टर मित्र, पण M नावाच्या टॅटूमुळे झाला वाद अन्...
असे सांगितले जात आहे की, स्मशानभूमीजवळून जात असताना एका व्यक्तीला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. या व्यक्तीनं घटनास्थळी जाऊन पाहिले तेव्हा एक नवजात बाळ मातीत अर्धे पुरले असल्याचे दिसून आले. यानंतर, त्याने नवजात बाळाला सुखरूप बाहरे काढले, आणि डॉक्टरांकडे घेऊन गेला.
वाचा-सलग 7 फ्लॉप चित्रपट देऊनही रिया चक्रवर्तीकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती!
स्मशानभूमीत नवजात दफन केल्याची माहिती मिळताच कुरू पोलिस स्टेशनचे प्रभारी अनिरुद्ध मुरारी कुमार घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे कुरू पोलिस स्टेशनचे प्रभारी अनिल ओरॉन यांचे म्हणणे आहे, नवजात मुलाचे पालक शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.