महाराष्ट्र, हरियाणासोबत झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा नाही? आयोग करणार वेगळं प्लानिंग

महाराष्ट्र, हरियाणासोबत झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा नाही? आयोग करणार वेगळं प्लानिंग

महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकींच्या तारखांची निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. पण झारखंडमधील निवडणुकीची घोषणा आयोग महाराष्ट्र, हरियाणासोबत करणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

  • Share this:

झारखंड, 19 सप्टेंबर : महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकींच्या तारखांची निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. पण झारखंडमधील निवडणुकीची घोषणा आयोग महाराष्ट्र, हरियाणासोबत करणार नसल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इतर राज्यांच्या तुलनेत झारखंडमध्ये निवडणुका घेण्याची परिस्थिती जरा वेगळी आहे. तसंच अद्याप राज्यातील विधानसभेचा अवधी समाप्त होण्यासाठी तीन महिने उर्वरित आहेत. तर दुसरीकडे, महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. पण या पत्रकार परिषदेत झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जाणार नाही.

झारखंड निवडणुकीसाठी आयोगाकडून वेगळं नियोजन

महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतरच झारखंड विधानसभा निवडणुकीचं नियोजन आणि तयारीला निवडणूक आयोगाकडून सुरुवात केली जाईल. 81 विधानसभा जागांच्या झारखंडमधील बहुतांश क्षेत्र नक्षलग्रस्त आहे. यामुळे निवडणुकीदरम्यान आयोगासमोर प्रचंड आव्हाने असतात. तसंच सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर निमलष्करी दलाची सर्वाधिक गरज भासते.

(वाचा : शिवसेनेचा पत्ता कट; मोदींसमोर चंद्रकांत पाटील म्हणतात, फडणवीसच पुन्हा होणार मुख्यमंत्री!)

झारखंडमध्ये अनेक टप्प्यांत होणार निवडणूक  

आयोगाकडून झारखंडमधील विधानसभा निवडणूक अनेक टप्प्यांत घेतली जाईल. झारखंडमधील नक्षलग्रस्त भागांची परिस्थिती पाहता एक-दोन टप्प्यांत निवडणुका घेणं आयोगानुसार कठीण बाब आहे. गेल्या वेळेस आयोगानं झारखंडमध्ये पाच टप्प्यांत मतदान प्रक्रिया राबवली होती.

(वाचा : VIDEO: युती तुटणार? फॉर्म्युल्याबाबत शिवसेनेचे संजय राऊत म्हणतात)

विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्याची शक्यता आहे. कारण आज संध्याकाळी निवडणूक आयोग पत्रकार परिषद होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुगलबंदी सुरू झाली आहे. निवडणूक तारखांची घोषणा झाल्यानंतर तर आरोप-प्रत्यारोपांचा स्वर टिपेला पोहचणार आहे. त्यामुळे आज निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन विधानसभेच्या तारखांची घोषणा करणार का, याकडे राजकीय पक्षांसह सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं आहे.

(वाचा : '...तेव्हा त्यांना पोटशूळ उठला होता', शरद पवारांची भाजपवर जहरी टीका)

निवडणूक तारखांआधीच उमेदवारांची घोषणा

विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करण्यासाठी राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पडझड रोखून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची गोळाबेरीज करण्यासाठी शरद पवार हे स्वत: मैदानात उतरले आहेत. बीडमध्ये आज शरद पवार यांनी मोठी घोषणा करत राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची नावंही जाहीर केली आहेत.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. मात्र आता या जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे बीडमध्ये शरद पवार यांनी तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसंच परळीमध्ये पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगणार आहे. कारण राष्ट्रवादीकडून भाजपच्या पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध धनंजय मुंडे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत.

कोणत्या मतदारसंघातून राष्ट्रवादीने कुणाला दिली उमेदवारी?

परळी - धनंजय मुंडे

बीड- संदीप क्षीरसागर

माजलगाव - प्रकाश सोळके

गेवराई - विजयसिंह पंडित

केज - नमिता मुंदडा

शरद पवार यांनी निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा केल्याने जिल्ह्यातील राजकारण मोठे चुरशीचे होणार आहे. राष्ट्रवादीच्या या खेळीला आता भाजप कसे उत्तर देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

VIDEO: उदयनराजेंनी साताऱ्याची पगडी घालून मोदींचं केलं स्वागत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 02:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading