Jharkhand Election Result हेमंत सोरेन यांच्यासाठी मुख्यमंत्री होणं नव्हतं सोपं...

Jharkhand Election Result हेमंत सोरेन यांच्यासाठी मुख्यमंत्री होणं नव्हतं सोपं...

झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात आहे. 2013 मध्ये भाजपबरोबर सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणाऱ्या सोरेन यांनी पाठिंबा काढून घेतल्याने राष्ट्रपती राजवट आली होती.

  • Share this:

रांची, 23 डिसेंबर : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे. आता झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित आहे. हेमंत सोरेन यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे येत आहे. हेमंत सोरेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं तर ते दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री होतील. झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचे ते पुत्र.

81 जागा असलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजपचा दारुण पराभव झाला. काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा आघाडीला 47 जागा मिळाल्यात तर भाजपला 25 जागांवर समाधान मानावं लागणार अशी चिन्हं आहेत.

वाचा - झारखंडमध्ये राजकीय भूकंप, भाजपचे मुख्यमंत्री पिछाडीवर

झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात आहे. 2013 मध्ये हेमंत सोरेन पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. या वेळी झामुमोला 30 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 16. स्वतः सोरेन यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली आणि जिंकली.

सोपं नव्हतं मुख्यमंत्री होणं

झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्वेसर्वा असणाऱ्या शिबू सोरेन यांच्या मोठ्या मुलाच्या दुर्गा सोरेन यांच्या अकाली मृत्यूनंतर हेमंत सोरेन राजकारणार आले. 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा आली. 2010 मध्ये भाजप - झामुमोच्या अर्जुन मुंडा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये हेमंत उपमुख्यमंत्री झाले. 2013 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चाने समर्थन काढून घेतलं आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.

शिबू सोरेन हे संथाल या आदिवासी जमातीचे मोठे नेते. त्यांना मानणारा मोठा वर्ग झारखंडमध्ये आहे. त्यांचं नेतृत्व करताना काँग्रेस- भाजपसारख्या केंद्रीय पक्षांशी व्यवहार करणं अशी तारेवरची कसरत हेमंत यांनी केली. या वेळची विधानसभा निवडणूक भाजपच्या विरोधात त्यांनी लढली. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाशी युती केली आणि या आघाडीला निर्विवाद बहुमत मिळालं.

------------------------

अन्य बातम्या

मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये तासभर चर्चा

अमृता यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

VIDEO: 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे'; विमानात साध्वी प्रज्ञावर भडकले प्रवासी

शिवाजी महाराजांचं नाव हटवल्यानं वाद चिघळणार, मराठा मोर्चाची ठाकरे सरकारला धमकी

First Published: Dec 23, 2019 08:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading