Home /News /national /

शिक्षणमंत्री आता झाले कॉलेज विद्यार्थी; मॅट्रिक पास मंत्र्याचा अकरावीत प्रवेश

शिक्षणमंत्री आता झाले कॉलेज विद्यार्थी; मॅट्रिक पास मंत्र्याचा अकरावीत प्रवेश

शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळता सांभाळता शिक्षणमंत्री आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षणही पूर्ण करणार आहेत.

    ज्ञानेंदु जयपुरियार/बोकारो, 11 जुलै : राज्याचा शिक्षणमंत्रीच (education minsiter) आता राज्यातील कॉलेजचा एक विद्यार्थी झाला आहे. एक शिक्षणमंत्री आता अभ्यासाचे धडे घेणार आहे. असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र हे खरं आहे. झारखंडच्या शिक्षमंत्र्यांनी कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं आहे. शिक्षणमंत्री जगरनाथ महतो आता कॉलेजमध्ये शिक्षणार आहे. एका शेतकरी कुटुंबातून असलेले झारखंडचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो (Jagarnath Mahto) दहावी पास आहेत. आता ते आपलं पुढील शिक्षण पूर्ण करणार आहेत. यासाठी त्यांनी अकरावीमध्ये प्रवेश घेतला आहे. बोकारोतील देवी महतो स्मारक इंटर महाविद्यालयातील आर्ट्स शाखेत त्यांनी अर्ज केला आहे. प्रवेशासाठी मंत्री स्वत: कॉलेजमध्ये गेले होते. शिक्षणमंत्री महतो यांनी सांगतिलं, 1995 साली त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली होती. त्यानंतर शिक्षण सोडलं. शिक्षणमंत्री म्हणून शपथ घेताना अनेक जण माझ्यावर हसले होतो. एका दहावी पास असलेल्याला शिक्षणमंत्री बनवलं जात असल्याने त्यांनी थट्टा केली. शिक्षण नीती चांगली कशी बनेल याबाबत प्रश्न उपस्थित केले मला त्याच सर्व प्रश्नांना आणि विरोधाला आता उत्तर द्यायचं आहे, असं जगरनाथ महतो म्हणाले. हे वाचा - देशातल्या शाळा केव्हा सुरु होणार? दिल्लीतल्या बैठकीनंतर नवी माहिती आली समोर! शिक्षण घेण्याचं कोणतंही वय नसतं. आपल्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता आपलं शिक्षणंही पूर्ण करणार आहे. स्वत:ही शिकणार आणि मुलांनाही चांगलं शिक्षण देणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शिक्षणमंत्र्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानं विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटलं, मात्र तितकाच त्यांना आनंदही झाला. शिक्षणमंत्री आपल्यासह वर्गात बसून शिकणार आणि अभ्यास करणार हे ऐकून खूप चांगलं वाटलं असं विद्यार्थिनी आरती कुमारी आणि प्रियंका कौशल म्हणाली.
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या