साखरपुड्याला केलेली ती चूक नवरदेवाला पडली महाग, मुलीनं मोडलं लग्न

साखरपुड्याला केलेली ती चूक नवरदेवाला पडली महाग, मुलीनं मोडलं लग्न

मुलाकडे लोक आत्ताच असे वागतात तर लग्नानंतर कसे वागतील असा प्रश्न मुलीच्या आई-वडिलांना पडला.

  • Share this:

रांची, 20 जून : लग्न म्हणजे आयुष्यातला सर्वात आनंदाचा आणि आठवणीत राहणारा प्रसंग. लग्नाच्या आधीचा सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे साखरपुडा. मात्र मुलाकडच्या लोकांनी केलेली एक चूक त्यांना चांगलीच महगात पडली. साखरपुड्यातच असं केलं तर लग्नानंतर ही मंडळी काय करणार असा प्रश्न मुलींच्या आईवडिलांना पडला आणि त्यांनी अवघ्या दहा तासांमध्ये ठरलेलं लग्न मोडलं. झारखंडमधल्या देवघरमध्ये ही घटना घडली. या घटनेची सर्व राज्यात जोरदार चर्चा होत असून सोशल मीडियावरही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

देवघर जवळच्या पिंडारी गावात मुस्लिम समाजातल्या एका प्रतिष्ठीत कुटुंबातल्या मुलीचा साखरपुडा होता. गावतली सर्व प्रतिष्ठीत मंडळी कार्यक्रमाला जमली होती. मुलाकडची मंडळी कार्यक्रमाला आली. मुलीचे सर्व नातेवाईकही जमले. सर्व आनंदात सुरू असताना एका घटनेनं सर्व आनंदावर पाणी फेरलं गेलं.

कार्यक्रम सुरू झाल्यावर मुला मुलींनी एकमेकांना ज्या भेटी द्यायच्या असतात त्यावेळी मुलाने मुलीसाठी जुनेच कपडे आणल्याचं मुलीकडच्यांना लक्षात आलं. ओढणी आणि सलवार कुर्ता जुना असल्याचं नवऱ्या मुलींच्या मैत्रिणींना लक्षात आलं त्यांनी ही गोष्ट घरातल्या ज्येष्ठ लोकांच्या कानावर घातली. त्यांना मुलाच्या या कृतीने धक्काच बसला.

मुलीकडच्यांनी जेव्हा याची विचारणा केली तेव्हा मुलाच्या नातेवाईकांनी जे उत्तर दिलं ते आणखीच धक्कादाक होतं. नवीन कपडे घरी विसरले आहेत. ते आणण्यासाठी आता वेळ नाही. त्यामुळं ही पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचं त्यांना सांगण्यात आलं. ही बेपर्वाई मुलींच्या वडिलांना अजिबात आवडली नाही. हे लोक अत्ताच असे वागतात तर लग्नानंतर कसे वागतील असा सवाल त्यांनी विचारला.

नंतर दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार भांडण झालं. शेवटी  हे प्रकरण स्थानिक आमदारांकडे गेलं. भांडण सोडवायला आमदार साहेब आले. त्यांनी समेटाचा प्रयत्न केला. मात्र कुणीच माघार घेत नसल्याने शेवटी त्यांनी मुलाच्या कुटुंबीयांना हुंडा म्हणून दिलेले साडेतीन लाख रुपये आणि सोनं परत करण्याचा आदेश दिला. पैसे आणि सोन परत मिळाल्यानंतर अवघ्या दहा तासांमध्येच लग्न मोडलं गेलं.

First published: June 20, 2019, 3:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading