मराठी बातम्या /बातम्या /देश /

अर्रर्र... पुन्हा आमदाराची जीभ घसरली! म्हणे 'कंगना रणौतच्या गालापेक्षा चिकने रस्ते आम्ही बनवणार'

अर्रर्र... पुन्हा आमदाराची जीभ घसरली! म्हणे 'कंगना रणौतच्या गालापेक्षा चिकने रस्ते आम्ही बनवणार'

Controversial statement on Kangana Ranaut: आमदार अन्सारी यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघासाठी सरकारकडून 14 रस्ते मंजूर करवून घेतले आहेत. या रस्त्यांच्या बांधकामासंदर्भात त्यांनी कंगनाविषयी वादग्रस्त विधान केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

जामताडा, 14 जानेवारी : अभिनेत्री कंगणा रणौतविषयी (Kangana Ranaut) वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी (Congress MLA Irfan Ansari) वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले जातील, असे ते म्हणाले. अन्सारी हे झारंखंडच्या जामताडामधील काँग्रेस आमदार आहेत. ते नेहमी वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्ये केल्याने चर्चेत राहिले आहेत.

RJD सुप्रीमो लालू प्रसाद यांच्या शैलीत ते म्हणाले की, अभिनेत्री कंगना रणौतच्या गालापेक्षा जामताडाचे रस्ते चिकने बनवले जातील. या रस्त्यांवरून आदिवासी मुले, तरुण आणि व्यापारी वर्गाला फायदा होईल. काही वर्षांपूर्वी लालू प्रसाद यांनी बिहारच्या रस्त्यांबाबत असेच विधान केले होते. बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालासारखा सुंदर रस्ता तयार करीन, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर बराच गदारोळ झाला होता.

वास्तविक, आमदार अन्सारी यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघासाठी सरकारकडून 14 रस्ते मंजूर करवून घेतले आहेत. या रस्त्यांच्या बांधकामासंदर्भात त्यांनी कंगनाविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. जामताडा येथील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण हे आपले प्राधान्य असल्याचे आमदार म्हणाले. परिसरातील आदिवासीबहुल गावातील रस्ते जागतिक दर्जाचे करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

जामताडामधील जनता यापुढे रस्त्यावरील धूळ खाणार करणार नाही, असा दावा त्यांनी केला. विशेषत: सर्व आदिवासीबहुल भागात उत्कृष्ट रस्ते बांधले जातील, जे परिसरातील लोकांसाठी एक मोठी भेट ठरेल.

हे वाचा - महाराष्ट्रात कधी लागू होणार Lockdown?,आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

आमदारांनी माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांचीही खिल्ली उडवली आणि त्यांना बाहेरचे संबोधले. त्यांच्याविषयी ते म्हणाले की, छत्तीसगडमधील एका व्यक्तीला झारखंडचा मुख्यमंत्री बनवणे हे राज्याचे दुर्दैव आहे.

हे वाचा - फोन कॉलवरून असा चोरी होऊ शकतो तुमचा OTP; गृह मंत्रालयाच्या Cyber Dost ने पुन्हा केलं अलर्ट

इरफान अन्सारी यांनी पंजाबमध्ये पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याच्या मुद्द्यावर विधान करताना वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यांनी पंतप्रधानांना पाकिस्तानला जाण्याचा सल्ला दिला होता. यावरून राज्यात जोरदार राजकीय खळबळ उडाली होती.

First published:

Tags: Kangana ranaut, काँग्रेस