झांसी (उत्तर प्रदेश), 04 जानेवारी : बांधकाम सुरू असताना भिंत कोसळ्याची मोठी घटना उत्तर प्रदेशच्या झांसीमध्ये घडली आहे. भिंत पडल्यामुळे ढिगाऱ्याखाली 15 कामगार अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 5 कामगारांचा मृत्यू झाल्या आहे. तर अनेक गंभीर जखमी आहेत. ही घटना बरुआसागर पोलीस स्टेशन परिसरातील लक्ष्मणपुरा गावची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही कामगार स्टोन क्रशरच्या भिंतीवर प्लास्टर करत असताना अचानक हा अपघात झाला. घटनास्थळावर मदत बचावकार्य सुरू झालं. या भीषण अपघातामध्ये मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
या अपघातावर अनेक संशयास्पद प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. असा आरोप केला जात आहे की, ज्या कामगारांनी क्रशर भिंत बांधली त्यांचं साधं रजिस्ट्रेशनही करण्यात आलं नव्हतं. त्यांना कोणतीही सुरक्षा उपकरणे पुरविली गेली नव्हती. कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय कामगार क्रशरवर काम करत होते. कैलास स्टोन क्रशरचा मालकावरही यामुळे वादात सापडला आहे. क्रशरची वेळेत तपासणी केली गेली असती तर इतका मोठा अपघात टाळता आला असता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल व्यक्त केला शोक
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. सीएम योगी यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना (डीएम) घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर जखमींना सर्व शक्य मदतीची ग्वाही देण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, अपघातात जखमींवर योग्य उपचारांची व्यवस्था करावी आणि पीडितांना मान्य असणारी आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावी. मुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्तांच्या आत्म्याला शांती लाभो आणि शोकग्रस्त कुटुंबांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.