आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान

आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू रस्त्यावर विकत आहे ऊस, पंतप्रधानांनी केला होता सन्मान

शिवम आनंद, ऋषभ आनंद आणि सौरभ आनंद या तिन्ही भावांनी देशविदेशात भारताचे प्रतिनिधित्व केले.

  • Share this:

20 नोव्हेंबर : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे शहर  झाशीमध्ये हॉकी खेळाडूंची मन हेलावून टाकणारी गोष्ट समोर आली आहे. हॉकीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू शिवम आनंद, ऋषभ आनंद आणि सौरभ आनंद यांच्यावर ऊस विकण्याची वेळ आली आहे.

शिवम आनंद, ऋषभ आनंद आणि सौरभ आनंद या तिन्ही भावांनी देशविदेशात भारताचे प्रतिनिधित्व केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून क्रीडा मंत्री चेतन चौहान यांनी या तिन्ही भावांचा सन्मान केला. पण आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्यामुळे तिघाही भावांना रस्त्यावर ऊस विकावा लागत आहे.

हे तिन्ही भाऊ आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू असून सुद्धा या तिन्ही भावांना घर चालवण्यासाठी फुटपाथवर ऊस आणि पान विकत आहे.

सकाळी आणि संध्याकाळी हाॅकीचा सराव केल्यानंतर मधल्यावेळेत तिघेही भाऊ आपल्या वडिलांसोबत ऊस विकतात. आपली व्यथा या तिन्ही भावांना पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मांडायची आहे.

पंतप्रधान मोदींनी केला होता सन्मान

या तिन्ही खेळाडूंची घरची परिस्थिती हलाखीची आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे हे तिन्ही भाऊ पत्राच्या घरात घरात राहतात.  ऋषभ आनंद म्हणतो की, ज्या प्रकारे किक्रेटला प्रोत्साहन दिलं जात त्याप्रकारे हाॅकीला दिले पाहिजे अशी आमची मागणी आहे.

विशेष म्हणजे, मेजर ध्यानचंद यांचा संबंध झाशीशी आहे. त्यांचा जन्म हा प्रयागराज इथं झाला होता. पण आजही झाशीमध्ये हॉकी खेळाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे.

====================

First published: November 20, 2018, 2:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading