S M L

Video व्हायरल : भाजप नेत्याची मुजोरी, विद्यार्थिनीला बळजबरीनं मागायला लावली माफी

‘नारी के सम्मान में, बीजेपी मैदान में’ अशी घोषणा देत उत्तर प्रदेशात भाजपनं बहुमत मिळवलं. मात्र सत्तेत आल्यावर सत्तेची मस्ती भाजप नेत्यांना लकरच चढली अशी अनेक उदाहरणं पुढे येत आहेत.

Ajay Kautikwar | Updated On: Jul 3, 2018 02:51 PM IST

Video व्हायरल : भाजप नेत्याची मुजोरी, विद्यार्थिनीला बळजबरीनं मागायला लावली माफी

लखनऊ,ता.3 जुलै : ‘नारी के सम्मान में, बीजेपी मैदान में’ अशी घोषणा देत उत्तर प्रदेशात भाजपनं बहुमत मिळवलं. मात्र सत्तेत आल्यावर सत्तेची मस्ती भाजप नेत्यांना लकरच चढली अशी अनेक उदाहरणं पुढे येत आहेत. महोबा जिल्ह्यात कोचिंग क्लासच्या नावावर एका शिक्षकाने विद्यार्थिनीची फसवणूक केली, त्याचा राग येवून तिने शिक्षकाला चोप दिल. विद्यार्थिनीला धडा शिकवण्यासाठी शिक्षकाने भाजप नेत्याची मदत मागितली आणि त्या भाजप नेत्याने विद्यार्थीनीलाच त्या फसवणूक करणाऱ्या शिक्षकाची माफी मागायला भाग पाडलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून भाजप नेत्याच्या कृतीवर संताप व्यक्त होत आहे.

महोबा जिल्ह्यातल्या चरखारी भागातल्या झंडा चौराहा बाजार इथली ही घटना आहे. कोचिंग क्लासच्या राजेश राजपूत या शिक्षकाने विद्यार्थिनीला तीन हजार रूपये लाच मागितली आणि काहीच शिकवलही नाही. पैसे परत मागितले असता त्याने पैसे तर दिलेच नाही उलट तीला त्रासच दिला. त्यामुळे तीने शिक्षकाला भरस्त्यात चोप दिला.

हेही वाचा

LIVE : महाराष्ट्रात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा

...जेव्हा सचिननं घातली शाहरुखला 'टोपी'!

Loading...

तुमच्या खिशातली पाचशेची नोट खरी आहे की खोटी ?

याचा राग आल्याने शिक्षक काही लोकांना आणि भाजप नेत्याला घेऊन मुलीकडे गेला. त्या नेत्याने मुलीला दम भरला आणि शिक्षकाच्या पायापडत त्याची माफी मागायला भाग पाडलं. या वेळी तिथे पाचशे जणांचा जमाव जमला होता. या घटनेनं ती मुलगी घाबरली आणि चक्कर येवून कोसळली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून भाजप नेत्याच्या कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2018 02:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close