Home /News /national /

3 Idiots प्रमाणे या महिला पोलिसाने केली गर्भवतीची डिलिव्हरी, स्वत: कापली बाळाची नाळ

3 Idiots प्रमाणे या महिला पोलिसाने केली गर्भवतीची डिलिव्हरी, स्वत: कापली बाळाची नाळ

उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये गोवा एक्सप्रेस ट्रेन (Goa Express Train)मध्ये एका गरोदर महिलेच्या मदतीला आरपीएफ (RPF) महिला उपनिरीक्षक राजकुमारी गुर्जर धावून आल्या आहेत.

    अश्वनी कुमार मिश्र, झाशी, 20 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये गोवा एक्सप्रेस ट्रेन (Goa Express Train)मध्ये एका गरोदर महिलेच्या मदतीला आरपीएफ (RPF) महिला उपनिरीक्षक राजकुमारी गुर्जर धावून आल्या आहेत. राजकुमारी यांनी प्रसुती वेदनांशी सामना करणाऱ्या महिलेची 'थ्री इडियट्स' (3 Idiots) सिनेमातील दृश्याप्रमाणे यशस्वी डिलिव्हरी केली आहे. प्रसूतीदरम्यान एक डॉक्टर या उपनिरिक्षिकेला सूचना देत होत्या. यावेळी आरपीएफ महिला उपनिरीक्षक राजकुमारी गुर्जर यांनी डॉक्टरची भूमिका साकारली. सध्या बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरुप असून त्यांना रेल्वे रूग्णालयात दाखल केले आहे. मध्यरात्री सुरू झाल्या प्रसुती वेदना गोवा एक्सप्रेसमध्ये चढल्यानंतर मध्यरात्री या महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या होत्या. ट्रेन झाशी शहरात पोहोचल्यानंतर याबाबत आरपीएफला माहिती देण्यात आली. यावेळी त्याठिकाणी पोहोचलेल्या आरपीएफच्या महिला उपनिरिक्षक राजकुमारी गुर्जर पोहोचल्या आणि त्यांनी त्यांच्या डॉक्टर मैत्रिणीला फोन केला. त्यांनी सर्व प्रकार त्यांच्या मैत्रिणीला सांगितला आणि त्यानंतर गुर्जर यांच्या डॉक्टर मैत्रिणीने त्यांना सर्व सूचना फोनवरून देण्यास सुरुवात केली. त्या सूचनांचे पालन करून राजकुमारी यांनी एक यशस्वी डिलीव्हरी केली. एवढच नव्हे तर बाळाची नाळ देखील त्यांनी स्वत: कापली. त्यानंतर त्वरित रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. स्वत: ब्लेडने कापली नाळ गुर्जर यांनी सांगितले की, 18 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा सुनील कुमार या व्यक्तीने अशी माहिती दिली की, गोवा एक्स्प्रेसमध्ये एका महिलेला प्रसूती वेदना होत आहेत. या माहितीवर मी आणि एसआय रवींद्रसिंग राजावत, एसआय प्राची मिश्रा आणि एसआय मधुबाला तिथे पोहोचलो. तिथे आम्हा सर्वांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहिल्यानंतर मी माझ्या डॉक्टक मैत्रिणीला संपर्क केला. डॉक्टरांच्या मदतीने गर्भवती महिलेची प्रसूती करण्यात आली. बाळाची नाळ ब्लेडने कापून त्याला आईपासून वेगळे केले गेले, प्रसूतीनंतर दोघांनाही रेल्वे रूग्णालयात नेण्यात आले असून दोघेही सुखरुप असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या