Home /News /national /

मंडपात पोहचली वरात तर वधूनं लावला पोलिसांना फोन मग...,असं अजब लग्न कधीच पाहिलं नसेल

मंडपात पोहचली वरात तर वधूनं लावला पोलिसांना फोन मग...,असं अजब लग्न कधीच पाहिलं नसेल

लॉकडाऊनमध्ये वर वधूच्या दारात वरात घेऊन गेला. मात्र वधूनं दुसऱ्याच मुलासोबत लग्न केलं. हे प्रकरण एवढं वाढलं की पोलिसांपर्यंत पोहचलं.

    झाशी, 03जून : कोरोनाच्या संकटात सध्या लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे सर्व धार्मिक आणि इतर सोहळे रद्द करण्यात आले आहे. मात्र या सगळ्यात एक धक्कादायक घटना घडली. लॉकडाऊनमध्ये वर वधूच्या दारात वरात घेऊन गेला. मात्र वधूनं दुसऱ्याच मुलासोबत लग्न केलं. हे प्रकरण एवढं वाढलं की पोलिसांपर्यंत पोहचलं. मात्र पोलिसांनी वधुच्या बाजूनं निर्णय देतं, वरात पुन्हा मागे पाठवली. यानंतर मुलीनं तिच्या प्रियकरासह मंदिरात लग्न केलं. कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी वधू-वरांना आशीर्वादही दिला. हे प्रकरण लहचूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ध्वाकार गावात घडलं. इथं राहणाऱ्या मुलीचं 30 मे रोजी लग्न ठरलं होतं. यामुळे शेजारीच असलेल्या माडवा गावात राहणारा नवरा मुलगा वरात घेऊन वधूच्या घरी पोहचला. मात्र दारात वरात पाहून मुलीनं चक्क 112 डायल करत पोलिसांनी बोलवलं. यानंतर वरात थेट लाहचूरा पोलीस स्टेशनमध्ये पोहचली. वाचा-गरोदर हत्तीणीला खायला दिलं फटाक्यांनी भरलेलं अननस, 3 दिवस पाण्यात उभी होती पण... पोलिसांनी आधी या प्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, पण मुलीनं लग्न करण्यास नकार दिला. वधुनं पोलिसांना सांगितले की, वर वयस्कर आहे आणि तिला तिच्या प्रियकराबरोबरच लग्न करायचं आहे. यावर पोलिसांनी मुलाची बाजू ऐकूण वरात परत पाठवली. त्यानंतर मंदिरात मुलीचा तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिलं. वाचा-रेखा-अमिताभ यांचे लव्ह सीन पाहिल्यावर काय झाली होती जया यांची अवस्था वाचा-...आणि डोळ्यादेखत कोसळली वीज, पाहा अंगावर शहारे आणणारा VIDEO
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Lockdown

    पुढील बातम्या