Home /News /national /

आता डिलिव्हरीआधी प्रत्येक प्रेग्ननंट महिलेची Corona Test; 'या' राज्य सरकारचा निर्णय

आता डिलिव्हरीआधी प्रत्येक प्रेग्ननंट महिलेची Corona Test; 'या' राज्य सरकारचा निर्णय

पहिल्या प्रकारामध्ये – किंचित ताप, डोकं दुखणं, कफ, वास न येणं छातिमध्ये दुखणं आणि थकवा जाणवतो

पहिल्या प्रकारामध्ये – किंचित ताप, डोकं दुखणं, कफ, वास न येणं छातिमध्ये दुखणं आणि थकवा जाणवतो

राज्यातील सर्व प्रेग्ननंट महिलांची कोरोना टेस्ट (pregnant woman corona test) करण्याचा निर्णय झारखंड (jharkhand) सरकारनं घेतला आहे.

    उपेंद्र कुमार/ रांची, 12 मे : कोरोनाव्हायरसचा (coronavirus) धोका पाहता झारखंड (jharkhand) राज्यातील सर्व प्रेग्ननंट महिलांची कोरोना टेस्ट (pregnant woman corona test) करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे राज्यातील 50 हजारपेक्षा अधिक प्रेग्ननंट महिलांची डिलीव्हरीपूर्वी कोरोना टेस्ट केली जाणार आहे. आपात्कालीन परिस्थिती कोणतीही समस्या उद्भवू नये, यासाठी सरकारनं योजना तयार केली आहे. मे महिन्यात राज्यात 51,933 गरोदर महिलांची प्रसूती होणार आहे. या सर्वांची सुरुवातीला कोरोना टेस्ट केली जाईल. रांचीतील नामकुमपासून ही टेस्ट सुरू करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी न्यूज-18 शी बोलताना सांगितलं की, "राज्यातील सर्व गर्भवती महिलांची सुरक्षित प्रसूती होणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे या महिन्यात बाळाला जन्म देणाऱ्या सर्व मातांची प्रसूतीपूर्वी कोरोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. राज्यभरात ट्रू नेट मशीन लावण्याचीही योजना आहे, जेणेकरून प्रसूतीवेळी कोणती समस्या उद्भवणार नाही. या योजनेअंतर्गत राज्यभरातील सर्व गर्भवती महिलांची कोविड-19 टेस्ट केली जाई, जेणेकरून आपात्कालीन परिस्थितीत नॉर्मल किंवा सिझेरियन प्रसूतीत कोणती समस्या उद्भवू नये" हे वाचा - 113 वर्षांच्या आजीने कोरोनाला हरवलं; व्हायरसमुक्त होणारी सर्वात वयस्कर रुग्ण रांचीतील सिव्हिल सर्जन डॉ. वीबी प्रसाद म्हणाले, "नामकुमसह रातू आणि सदर परिसरातही गर्भवती महिलांची कोविड-19 टेस्ट केली जाईल. रांची जिल्ह्यात जवळपास 3,500 गर्भवती महिला आहेत, ज्यांची पुढील 3-7 दिवसांत कोरोना टेस्ट केली जाईल. या योजनेअंतर्गत कोरोना चाचणीसह गर्भवती महिलांची आरोग्याची तपासणी होईल. त्यांच्या मोबाइल नंबरसह आवश्यक असेलल्या सर्व माहितीची नोंद ठेवली जाईल" हे वाचा - परिचारिका दिन : विपरीत परिस्थितीत लढणाऱ्या कोरोना योद्धांच्या सरकारकडून अपेक्षा रांचीतील रिम्स आणि सदर रुग्णालयात बाळांना जन्म दिल्यानंतर काही महिलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. ज्यामुळे त्यांची प्रसूती करणारे डॉक्टर आणि नर्सना क्वारंटाइन व्हावं लागलं. शिवाय प्रसूती विभागही काही दिवस बंद ठेवावा लागला. यानंतर खासगी नर्सिंग होम आणि रुग्णालयांनाही गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी दाखल करून घेतलं नाही. ज्यामुळे काही महिलांच्या गर्भातच बाळााच मृत्यू झाला. त्यामुळे आता सरकारनं रुग्णालय आणि गर्भवती महिलांचा विचार करता प्रसूतीआधी महिलांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Pregnant woman

    पुढील बातम्या