Elec-widget

मोदी मोदी असा नारा देत भाजप कार्यकर्ते गटारात पडले...

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोमध्ये कार्यकर्ते चक्क गटारात पडल्याचा प्रकार घडला आहे.

  • Share this:

लोकसभा निवडणुकांसाठीचं मतदान अंतिम टप्प्यात आलं असताना आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्य़े मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पण भाजप मुख्यमंत्र्यांच्या रोड शोमध्ये कार्यकर्ते चक्क गटारात पडल्याचा प्रकार घडला आहे.

झज्जरमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. पण यावेळी नगरपालिकेचा भोंगळा कारभार समोर आला. या रोड शोवेळी झज्जरच्या आंबेडकर चौकात पालिकेद्वारे बांधण्यात आलेली गटारं उघडीच ठेवली होती. त्यावर कोणतंही झाकण नव्हतं. आणि गर्दीमध्ये नेमके कार्यकर्ते या गटारामध्ये पडले.

रोड शोदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणा होत होत्या. रस्त्यावर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. त्यावेळी रस्त्यावर उघड्या असलेल्या गटारात कार्यकर्ते पडले.

Loading...

प्रचारासाठी सुटा-बुटात असलेले भाजप कार्यकर्ते गटारात पडल्यामुळे चिखलाने माखले. त्यांना लगेच बाहेर काढण्यात आलं. पण या सगळ्या प्रकारामुळे गावात पालिकेनं काय कामं केली हेच समोर आलं. दरम्यान, गटारात पडल्य़ाचे भाजपा कार्यकर्त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गटारावर झाकण लावण्यात आलेलं नाही यासंदर्बात पालिका सचिव नरेंद्र सैनी यांना प्रश्न विचारला असता, गटाराचं काम सुरु होतं. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही नरेंद्र सैनी यांनी सांगितलं.

खरंतर मुख्यमंत्र्यांचा रोड शो होणार यासाठी शहर साफसफाई करण्यात आली होती. पण तरीही असा प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 07:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...