गृहपाठ केला नाही म्हणून 'ती'ला अमानुष शिक्षा, शिक्षकानं लगावण्यास सांगितल्या 168 थप्पड

गृहपाठ केला नाही म्हणून 'ती'ला अमानुष शिक्षा, शिक्षकानं लगावण्यास सांगितल्या 168 थप्पड

विद्यार्थिनीला अमानुष वागणूक दिल्याबाबत शाळेतील एका शिक्षकाविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

  • Share this:

भोपाळ, 15 मे : विद्यार्थिनीला अमानुष वागणूक दिल्याबाबत शाळेतील एका शिक्षकाविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. वर्गातल्या एका विद्यार्थिनीनं गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकानं चक्क दुसऱ्या विद्यार्थ्यांना तिला थप्पड मारण्याची अघोरी शिक्षा दिली. यानुसार विद्यार्थिनीला तब्बल 168 थप्पड लगावण्यात आल्या. या घटनेचा तपास केल्यासनंतर पोलिसांनी पाच महिन्यांनंतर शिक्षकाविरोधात अटकेची कारवाई केली.

हा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील झबुआ येथील सरकारी शाळेतील आहे. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला ही अमानुष शिक्षा देण्यात आली आहे. विद्यार्थिनीचे वडील शिव प्रताप सिंह यांनी सांगितले की, 'माझी मुलगी 11 जानेवारीला शाळेचा गृहपाठ करून गेली नव्हती. यावेळेस शिक्षक मनोज कुमार वर्मा यांनी वर्गातील अन्य 14 विद्यार्थ्यांना रोज माझ्या मुलीला थप्पड लगावण्यास सांगितल्या. यानुसार रोज माझ्या मुलीला अन्य विद्यार्थ्यांकडून दोन वेळा थप्पड खाव्या लागत होत्या आणि हा प्रकार सलग सहा दिवस सुरू होता'.

वाचा : BJP नेत्याचा फोटो वापरून सुरू केलं अॅडल्ट अकाऊंट, महिलेने मोदींकडे मागितली मदत

'आजारी असल्यानं गृहपाठ पूर्ण केला नाही'

जेव्हा विद्यार्थिनीच्या वडिलांनी या प्रकाराबाबत समजलं, तेव्हा ते प्रचंड संतापले. याप्रकरणी 22 जानेवारीला त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर शिक्षक वर्मा अचानक बेपत्ता झाला होता. मात्र अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. शिक्षकाविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला.

याबाबत पोलीस अधीक्षक विनीत जैन यांनी सांगितलं की, 'आजारी असल्यानं विद्यार्थिनीनं गृहपाठ केला नव्हता. याबाबतची माहिती विद्यार्थिनीच्या वडिलांनी शाळेतही कळवली होती. पण शिक्षकानं कारण जाणून न घेताच मुलीला शिक्षा दिल्याचा आरोपी तिच्या वडिलांनी केला आहे'.

वाचा :बदनापूर तालुक्यात तरुणाचा निर्घृण खून, डोक्यात धारदार शस्त्राने केले वार

VIDEO: 'तू झक्कास दिसतेस' म्हणताच तरुणीने युवकाला चपलेनं धुतलं

First published: May 15, 2019, 4:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading