विकृतीचा कळस, महिलेच्या गुप्तांगात टाकली मिरची

विकृतीचा कळस, महिलेच्या गुप्तांगात टाकली मिरची

ही घटना झाबुआ जिल्ह्यातील रायपुरिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.

  • Share this:

मध्यप्रदेश, 09 जुलै : झाबुआ जिल्ह्यात एक महिलेवर अत्याचाराची परिसीमा गाठलीये. जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण करून गुप्तांगात मिरची टाकल्याची धक्कादायक घटना घडलीये. धक्कादायक म्हणजे या महिलेसोबत झालेल्या घटनेनंतरही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

निर्भयाच्या 3 आरोपींना फाशी कायम, सुप्रीम कोर्टाने फेटाळली फेरविचार याचिका

घडलेली हकीकत अशी की, पीडित महिला आणि तिची आई शेतात काम करत होती. तेव्हा जमीन बळकावण्यासाठी जवळच्या नातेवाईक मुकेश, रत्तू आणि सांगला यांनी आई लेकीवर हल्ला केला. मिरचीच्या शेतात या दोन्ही मायलेकींना मारहाण करून अंगावर मिरची चोळण्यात आली. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी पीडित महिलेच्या गुप्तांगात मिरची टाकली आणि अश्लिल चाळे केले. ही घटना झाबुआ जिल्ह्यातील रायपुरिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. पीडित महिलेला उपचारासाठी ट्रामा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडित महिलेची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहे.

संभाजी भिडेंना अटक करा, विरोधीपक्षांची विभानसभेत मागणी

पीडित महिला ही विवाहित असून तिने आपल्या माहेरी राहत होती तेव्हा तिच्यावर हा हल्ला झाला. पोलिसांत जेव्हा तक्रार करण्यात आली तेव्हा पोलिसांनी चुकीचा रिपोर्ट लिहिला असा आरोप पीडित महिलेनं केलाय. पोलिसांनी या महिलेचा जबाब नव्याने नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.

First published: July 9, 2018, 7:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading