Home /News /national /

विमान प्रवासादरम्यान महिलेचे लाखोंचे दागिने गायब, विमानतळावर एकच गोंधळ

विमान प्रवासादरम्यान महिलेचे लाखोंचे दागिने गायब, विमानतळावर एकच गोंधळ

विमानतळावर उतरल्यानंतर संजू या बेल्ट नंबर दोनवर आपलं लगेज (luggage) घेण्यासाठी गेल्या असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली बॅग घेतल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं, की त्यांच्या बॅगमधील दागिने (Jewelry) गायब आहेत.

    पटना 23 मार्च : पटना विमानतळावर (Patna Airport) सोमवारी रात्री एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीहून पटनाला आलेल्या एका महिला प्रवासीनं आपल्या सामानातून 4 लाख किमतीचे दागिने (Jewelry) गायब झाल्याचं सांगितलं. पटनाच्याच सिपारा परिसरात राहाणाऱ्या प्रवासी संजू दिल्लीहून पटनाला (Delhi To Patna Filght) आल्या होत्या. पटना विमानतळावर उतरल्यानंतर संजू या बेल्ट नंबर दोनवर आपलं लगेज घेण्यासाठी गेल्या असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपलं सामान घेतल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं, की त्यांच्या बॅगची चैन उघडलेली होती. यानंतर तपासणी केली असता महिलेच्या लक्षात आलं,की हिरे आणि सोन्याचे चार लाखाचे दागिने गायब असल्याचं या महिलेच्या लक्षात आलं. महिलेनं तात्काळ विमान कंपनीच्या प्रतिनिधींकडे याबाबतची तक्रार केली. यानंतर विमानतळाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. लगेचच याप्रकरणाची दिल्लीपासून पटनापर्यंत चौकशी सुरू केली गेली. पटना विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आली. मात्र, यामध्ये काहीही पुरावा सापडला नाही. महिला प्रवासीच्या म्हणण्यानुसार त्यांचे दागिने विमान प्रवासाच्या दरम्यानच गायब झाले आहेत. तर, विमान कंपनीचे प्रतिनीधी मात्र सध्या या प्रकरणावर काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहेत. मंगळवारी सीआयएसएफद्वारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली. विमान कंपनीच्या प्रतिनिधींचा असा अंदाज आहे, की महिलेचे दागिने विमानतळाच्या परिसरात येण्याआधीच गायब झाले आहेत. मात्र, याशिवाय महिलेनं दिलेल्या तक्रारीमुळे दिल्लीपासून पटनापर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरू केली गेली आहे. याच विमानानं पटना येथे आलेल्या इतर काही प्रवाशांच्या बॅगही उघडण्यात आल्याचा आरोप केला गेला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Airport, Jewellery shop

    पुढील बातम्या