जेट एअरवेजच्या विमानाचं उड्डाण का थांबवलं ?

जेट एअरवेजच्या विमानाचं उड्डाण का थांबवलं  ?

आर्थिक संकटात असलेल्या जेट एअरवेज कंपनीला आणखी अडचणींना सामोर जावं लागतं आहे. आता हवाई मार्गाने मालाची वाहतूक करणाऱ्या एका युरोपियन कंपनीने जेट एअरवेजचं एक विमान जप्त केलं.

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल : आर्थिक संकटात असलेल्या जेट एअरवेज कंपनीला आणखी अडचणींना सामोर जावं लागतं आहे. एका युरोपियन कंपनीने जेट एअरवेजचं उड्डाण रद्द केलं.नेदरलँडमधल्या अॅमस्टरडॅम विमानतळावर या कंपनीने जेट एअरवेज वर ही कारवाई केली.

जेट एअरवेजने पैसे भरले नसल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली, असं युरोपियन कंपनीने म्हटलं आहे. जेटचं हे विमान गुरुवारी अॅमस्टरडॅमहून मुंबईला येणार होतं. पण याच विमानावर ही कारवाई झाली.

आर्थिक चणचणीमुळे जेट एअरवेजला आपल्या तीन चतुर्थांश विमानांची उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. या कंपनीची आधी 123 विमानं सेवेत होती पण आता त्यातल्या फक्त 25 विमानांचं उड्डाण होऊ शकलं.

कर्जबाजारीच्या खाईत सापडलेल्या या नामांकित विमान कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार देण्याएवढेही पैसे नाहीत. कंपनीच्या एकूण 16 हजार कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारापैकी काही रक्कम देण्यात आली आहे. म्हणूनच काही पायलट्सनी कंपनीच्या व्यवस्थापनाला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

अॅमस्टरडॅमहून मुंबईला येणारं जे विमान रद्द झालं त्याबद्दल जेट एअरवेजने खुलासा दिला आहे. या विमानाचं उड्डाण ऑपरेशनल कारणांमुळे रद्द झालं, असं कंपनीचं म्हणणं आहे.

जेट एअरवेजने 13 वर्षांपूर्वी महाकाय विमानं खरेदी केली होती. ही खरेदी कंपनीला महागात पडते आहे. त्यातच विमानसेवा चालवण्याचा वाढता खर्च आणि तिकिटांचे घटते दर या कात्रीत ही कंपनी सापडली आहे. देशांतर्गत विमान वाहतुकीपेक्षा जेटने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केलं. या योजनेमध्ये फसल्यामुळे कंपनीवर कर्जाचा भार झाला आहे.

जेट एअरवेज ही 26 वर्षं जुनी विमान कंपनी आहे. पण मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळे या कंपनीला या संकटातून बाहेर कसं काढायचं, असा प्रश्न कंपनीच्या व्यवस्थापनाला पडला आहे. याच संकटामुळे जेटचे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल यांनी मार्च महिन्यातच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

================================================================================================================================================================

VIDEO: एवढ्या वर्षांत मोदींनी त्यांच्यावर झालेले आरोप कसे सहन केले - विवेक ओबेरॉय

First published: April 10, 2019, 5:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading