• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 'जेट' ने रद्द केली सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणं, या विमानांचा 'टेक ऑफ' ही रद्द

'जेट' ने रद्द केली सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणं, या विमानांचा 'टेक ऑफ' ही रद्द

आर्थिक संकटात असलेल्या जेट एअरवेजने त्यांची सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द केली आहेत. गुरुवारी म्हणजे 11 एप्रिलच्या रात्रीची सगळी उड्डाणं 'ऑपरेशनल' कारणांसाठी रद्द करत आहोत, असं जेट एअरवेजने म्हटलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 11 एप्रिल : आर्थिक संकटात असलेल्या जेट एअरवेजने त्यांची सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द केली आहेत. गुरुवारी म्हणजे 11 एप्रिलच्या रात्रीची सगळी उड्डाणं 'ऑपरेशनल' कारणांसाठी रद्द करत आहोत, असं जेट एअरवेजने म्हटलं आहे. त्याचबरोबर कोलकाता, पाटणा, गुवाहाटी यासारख्या पूर्व आणि ईशान्य भारतातल्या विमानतळांवरूनही जेट ची उड्डाणं होणार नाहीत, असं कंपनीने म्हटलं आहे. ANI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. मुंबई - कोलकाता, कोलकाता - गुवाहाटी आणि डेहरादून - गुवाहाटी या सगळ्या विमानांची शुक्रवारी होणारी उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत. 14 विमानांचंच उड्डाण जेट एअरवेजची 123 विमानं आधी सेवेत होती. 11 एप्रिलला म्हणजे गुरुवारी त्यातली फक्त 14 विमानंच उडू शकली. या तिकिटांचा परतावा प्रवाशांना दिला जाईल,असं जेट एअरवेजने म्हटलं आहे. या एअरलाइन्सची आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांची क्षमता आहे की नाही, याबद्दल तपासणी होण्याची शक्यता आहे, असं वृत्त PTI ने दिलं आहे. https://lokmat.news18.com/national/this-compney-will-buy-shares-of-jet-airways-361441.html ज्या कंपनीची 20 विमानं आंतरराष्ट्रीय सेवेत असतात त्यांनाच आंतरराष्ट्रीय विमानसेवेची परवानगी देण्यात येते. जेट एअरवेजच्या 7 विमानांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर इंडियन ऑयल ने जेटला होणाऱ्या इंधनाचा पुरवठा बंद केला आहे. जेट कोण घेणार विकत? आर्थिक चणचणीमुळे जेट एअरवेजला आपल्या तीन चतुर्थांश विमानांची उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. कर्जबाजारीच्या खाईत सापडलेल्या या नामांकित विमान कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार देण्याएवढेही पैसे नाहीत. या 26 वर्षं जुन्या विमान कंपनीला आर्थिक संकटातून कसं बाहेर काढायचं, असा प्रश्न व्यवस्थापनाला पडला आहे. संकटात सापडलेली ही कंपनी विकत घेण्यासाठी संयुक्त अरब अमिरात मधल्या एका बड्या हवाई कंपनीने तयारी दाखवली आहे. ही कंपनी आहे, एतिहाद एअरवेज. ही कंपनी जेटमधली आपली भागीदारी 49 टक्के करणार आहे.एतिहादची जेटमध्ये आधीच 24 टक्के भागीदारी आहे. जेट एअरवेजच्या या भागीदारीचा लिलाव 12 एप्रिलला केला जाईल.'एतिहाद एअरवेज'शिवाय आणखी कोणत्याही कंपनीने ही बोली लावलेली नाही.त्यामुळे महागडी एअरलाइन कंपनीच जेट एअरवेजचं भवितव्य ठरवेल, असं म्हटलं जात आहे. ======================================================================================================================================================= VIDEO : त्यावेळी नेमकं काय घडलं? गिरीश महाजनांचा खुलासा
  First published: