जेट एअरवेज तात्पुरती बंद होण्याची शक्यता, 8 हजार कोटींचा तोटा

जेट एअरवेज तात्पुरती बंद होण्याची शक्यता, 8 हजार कोटींचा तोटा

एकेकाळी भारताची सगळ्यात मोठी एअरलाइन असलेली जेट एअरवेज तात्पुरती बंद करण्याची वेळ व्यवस्थापनावर आली आहे. जेट एअरवेजकडे 123 विमानांचा ताफा आहे पण त्यातल्या फक्त 7 विमानांचं उड्डाण होऊ शकणार आहे.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल : एकेकाळी भारताची सगळ्यात मोठी एअरलाइन असलेली जेट एअरवेज तात्पुरती बंद करण्याची वेळ व्यवस्थापनावर आली आहे. जेट एअरवेजकडे 123 विमानांचा ताफा आहे पण त्यातल्या फक्त 7 विमानांचं उड्डाण होऊ शकणार आहे.

एअरलाइन सुरू ठेवण्यासाठी कर्जदारांकडून पुरेसे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला, अशी सूत्रांची माहिती आहे.

कर्जबाजारी झालेल्या या एअरलाइनच्या संचालक मंडळाची मंगळवारी बैठक झाली. जेटचं भवितव्य काय यावर त्यांची चर्चा झाली. कर्जदारांनी आश्नासन दिलेले 1500 कोटी रुपये न मिळाल्याने एअरलाइन तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कर्जदारांसोबत सोमवारी झालेल्या बैठकीतून काहीच निष्पन्न झालं नाही.

पगार थकले

जेट एअरवेजला पायलट्स, इंजिनिअर्स यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

जेटचे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांनी गेल्याच महिन्यात पदाचा राजीनामा दिला आहे. एअरलाइन कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांना राजीनामा देणं भाग पडलं.

जेट एअरवेजचे सीईओ विनय दुबे यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून कळवलं आहे की, व्यवस्थापनाचे सदस्य संचालक मंडळाशी चर्चा करून पुढची दिशा ठरवतील. एअरलाइन सुरू राहावी यासाठी तात्पुरतं अर्थसाह्य मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे, असंही विनय दुबे यांनी म्हटलं आहे.

19 एप्रिलपर्यंत सेवा बंद

सध्या तरी जेट एअरवेजची आंतरराष्ट्रीय सेवा 19 एप्रिल पर्यंत बंद असेल, अशी माहिती आहे. त्यानंतर पुन्हा एअरलाइन सुरू करायची असेल तर मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागणार आहे.

यूएईची बडी हवाई कंपनी एतिहाद एअरवेज जेट एअरवेजमधली आपली भागीदारी वाढवणार, अशी चर्चा आहे. तसं झालं तर जेट एअरवेजवरचं आर्थिक संकट काही प्रमाणात दूर होऊ शकतं.

==========================================================================================================================================================

SPECIAL REPORT : उर्मिलांच्या प्रचारात 'मोदी-मोदी' घोषणा देऊन कुणी घातला राडा?

First published: April 16, 2019, 4:58 PM IST

ताज्या बातम्या