S M L

जेटच्या 22 हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात, अशी आहे A टू Z स्टोरी!

गेल्या दशकभरात किंगफिशरनंतर सेवा बंद करणारी जेट ही दुसरी कंपनी ठरली आहे.

Updated On: Apr 18, 2019 05:05 PM IST

जेटच्या 22 हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात, अशी आहे A टू Z स्टोरी!

नवी दिल्ली, 18 एप्रिल: गेल्या दशकभरात किंगफिशरनंतर सेवा बंद करणारी जेट ही दुसरी कंपनी ठरली आहे. याआधी विजय मल्ल्याची किंगफिशर ही विमान कंपनी 2012मध्ये बंद झाली होती. आता 26 वर्ष सेवा देणारी जेट एअरवेजने आपल्या सेवा बंद केल्या आहेत. एकेकाळी 650 उड्डाण करणारी या कंपनीला बँकेकडून घेतलेले कर्ज फेडता आले नाही. अर्थात आता कंपनीने सेवा बंद केल्यानंतर कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा फाटका बसला आहे. त्यातच जेटचे समभाग देखील 27 टक्क्यांहून अधिक कोसळले आहेत.

जेटला वाचवण्यासाठी कंपनीने बँकांकडून 400 कोटी रुपयांची मागणी केली होती. पण बँकांनी त्यास नकार दिला. उड्डाण बंद झाल्यामुळे जेटचे 16 हजार नियमीत कर्मचारी आणि 6 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या 3 महिन्यापासून जेटच्या कर्मचाऱ्यांना पगारच दिला नाही. धक्कादायक गोष्ट म्हणजे जेटने सेवा बंद करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांना सांगितलाच नाही. जेट उड्डाण बंद करणार आहे ही बातमी कर्मचाऱ्यांना प्रसार माध्यमांकडून कळाली होती. दरम्यान, जेटच्या व्यवस्थापनाने कोणतीच कल्पना दिली नसल्याने कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पगार मिळण्यासाठी कायदेशी व रस्त्यावरची लढाई लढू असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

26 बँकांचे कर्ज


जेट एअरवेजवर एकूण 26 बँकांचे तब्बल 8 हजार 500 कोटींचे कर्ज आहे. यातील काही बँका खासगी आणि परदेशातील आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा विचार करता यात कॅनरा, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, अलहाबाद बँक, एसबीआय आणि पीएनबीचा समावेश आहे. तर यस बँक आणि आयसीआय या खासगी बँकांकडून जेटने कर्ज घेतले आहे. 2010च्या आर्थिक संकटानंतर जेटची परिस्थिती बिघडत गेली. तेव्हा कंपनीला सलग चार तिमाहीत तोटा झाला होता. त्यानंतर जेटला कर्जाचे हफ्ते देता आले नव्हते.

सहाराची खरेदी केली आणि संकट सुरू झाले

गोयल यांनी 2007मध्ये सहारा कंपनी विकत घेतली होती. तेव्हा त्या कंपनीचे नाव जेटलाईट असे नाव देण्यात आले. पण यासाठी जेटला मोठी किमत मोजावी लागली. अखेर ती कंपनी 20 हजार कोटींना बुडली. तेव्हापासून जेटला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

Loading...

नरेश गोयल यांनी 1991मध्ये एअर टॅक्सीच्या स्वरुपात जेटची सुरुवात केली होती. तेव्हा भारतात खासगी कंपन्यांना विमान सेवा देण्याची परवानगी नव्हती. पण त्यानंतर एका वर्षात जेटने 4 विमाने विकत घेतले आणि 5 मे 1993 रोजी मुंबई-अहमदाबाद मार्गावर पहिले उड्डाण केले होते.


भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारल्याने खळबळ, पाहा व्हिडिओ


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 04:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close