जेट जमिनीवर, आज रात्री मुंबईतून होणार शेवटचं उड्डाण!

जेट जमिनीवर, आज रात्री मुंबईतून होणार शेवटचं उड्डाण!

एकेकाळी भारताची सगळ्यात मोठी एअरलाइन असलेली जेट एअरवेजची सेवा आज रात्रीपासून बंद होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली/मुंबई, 17 एप्रिल: एकेकाळी भारताची सगळ्यात मोठी एअरलाइन असलेली जेट एअरवेजची सेवा आज रात्रीपासून बंद होणार आहे. बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतून आज रात्री 10.30वाजता शेवटचे उड्डाण होणार आहे.

आज रात्रीपासून जेटच्या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील उड्डाण तातडीने थांबवण्यात येत आहेत असे वृत्त एएनआयने दिले आहे.गेल्या 25 वर्षांपासून उड्डाण करणाऱ्या या कंपनीवर 8 हजार कोटींपेक्षा अधिक कर्ज आहे. जर कंपनी बंद पडली तर 20 हजार लोकांच्या नोकऱ्या जातील. याआधी कंपनीने 18 एप्रिलपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण रद्द केल्या होत्या. मंगळवारी नागरी उड्डाणन सचिव प्रदीप सिंह खारोला यांनी जेटची केवळ पाच विमान सेवेत असल्याचे सांगितले होते.

पगार थकले

जेट एअरवेजला पायलट्स, इंजिनिअर्स यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. जेटचे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांनी गेल्याच महिन्यात पदाचा राजीनामा दिला आहे. एअरलाइन कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांना राजीनामा देणं भाग पडलं.

बातमी अपडेट होत आहे

जेव्हा 20 सिंहांचा कळप गावच्या दिशेनं येतो...

First published: April 17, 2019, 6:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading