मराठी बातम्या /बातम्या /देश /

बंद पडलेली Jet Airways हिंदुजा ग्रुप घेण्याची शक्यता

बंद पडलेली Jet Airways हिंदुजा ग्रुप घेण्याची शक्यता

जेट एअरवेजला चांगला गुंतवणूकदार भेटला तर हजारो कर्मचाऱ्यांवरचं संकट टळणार आहे.

जेट एअरवेजला चांगला गुंतवणूकदार भेटला तर हजारो कर्मचाऱ्यांवरचं संकट टळणार आहे.

जेट एअरवेजला चांगला गुंतवणूकदार भेटला तर हजारो कर्मचाऱ्यांवरचं संकट टळणार आहे.

    नवी दिल्ली 21 मे : गेल्या काही महिन्यांपासून बंद पडलेली जेट एअरवेज ही कंपनी हिंदुजा ग्रुप घेण्याची शक्यता आहे. कंपनीने त्यासाठी इच्छा व्यक्त केली असून पुढच्या आढवड्यात बोली लावली जाणार असल्याची माहिती पुढं आलीय. यासाठी कंपनीला नरेश गोयल आणि गुंतवणूकदार कंपनी एतिहाद एअरवेज यांची मंजूरीही घेतली आहे. तोट येत असल्याने जेटने आपल्या सर्व सेवा स्थगित केल्या होत्या. इतर मोठ्या कंपन्यांनी त्यात गुंतवणूक करावी किंवा ही कंपनीच विकत घ्यावी असाही प्रयत्न करण्यात येत होता. मात्र फार कंपन्या पुढे आल्या नाहीत. त्यामुळे जेटच्या कर्मचाऱ्यांची चिंता वाढली होती. जेट बंद झाल्याने हजारो कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. जीपी हिंदुजा आणि अशोक हिंदुजा या हिंदुजा बंधूंनी याबाबत संबधीत बँकांशीही चर्चा सुरू केलीय. जेट चे मालक नरेश गोयल आणि हिंदुजा बंधूंमध्ये 20 वर्षांपेक्षा जास्त काळापासून मैत्री आहे. त्यामुळे व्यवहारासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. हिंदुजा समुहाचा जगभर व्यवसाय असून ते ब्रिटनमधल्या सर्वात श्रीमंत नागरिकांपैकी एक आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार थकला जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार मिळायला अजून उशीर लागणार आहे. बँकांकडून अर्थपुरवठा न झाल्याने कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात अडचणी येत आहेत, असं जेट एअरवेजचे सीईओ विनय दुबे यांनी म्हटलं आहे. बँकांकडून अर्थपुरवठा नाही जेटच्या व्यवस्थापनाने बँकांकडून अर्थपुरवठा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण ते शक्य न झाल्यामुळे पगार देणं लांबणीवर पडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कर्जबाजारी झालेल्या जेट एअरवेजचे पायलट, इंजिनिअर्स आणि व्यवस्थापन विभागातले अधिकारी असे मिळून 16 हजार कर्मचारी आहेत. या सगळ्यांचे पगार जानेवारी महिन्यापासून थकले आहेत. विमानं जमिनीवरच एकेकाळी भारतातली सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या जेट एअरवेजची अत्यंत हलाखीची स्थिती झाली आहे.  गेल्या आठवड्यात जेट एअरवेजने आपल्या सगळ्या विमानांचं उड्डाण रद्द केलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने अर्थपुरवठा करण्यास नकार दिल्याने या एअरलाइन कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला.
    First published:

    पुढील बातम्या