• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • कधी मिळणार पगार ? जेटच्या 16 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा नाहीच

कधी मिळणार पगार ? जेटच्या 16 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा नाहीच

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार मिळायला अजून उशीर लागणार आहे. बँकांकडून अर्थपुरवठा न झाल्याने कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात अडचणी येत आहेत, असं जेट एअरवेजचे सीईओ विनय दुबे यांनी म्हटलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 26 एप्रिल : जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार मिळायला अजून उशीर लागणार आहे. बँकांकडून अर्थपुरवठा न झाल्याने कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात अडचणी येत आहेत, असं जेट एअरवेजचे सीईओ विनय दुबे यांनी म्हटलं आहे. बँकांकडून अर्थपुरवठा नाही जेटच्या व्यवस्थापनाने बँकांकडून अर्थपुरवठा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण ते शक्य न झाल्यामुळे पगार देणं लांबणीवर पडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कर्जबाजारी झालेल्या जेट एअरवेजचे पायलट, इंजिनिअर्स आणि व्यवस्थापन विभागातले अधिकारी असे मिळून 16 हजार कर्मचारी आहेत. या सगळ्यांचे पगार जानेवारी महिन्यापासून थकले आहेत. विमानं जमिनीवरच एकेकाळी भारतातली सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या जेट एअरवेजची अत्यंत हलाखीची स्थिती झाली आहे.  गेल्या आठवड्यात जेट एअरवेजने आपल्या सगळ्या विमानांचं उड्डाण रद्द केलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने अर्थपुरवठा करण्यास नकार दिल्याने या एअरलाइन कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला. गुंतवणूकदारांची प्रतीक्षा जेट एअरवेजवर 8 हजार 400 कोटी रुपयांचं कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी जेट एअरवेजचं व्यवस्थापन एअरलाइनची विक्री करण्यासाठी खटाटोप करत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस काही गुंतवणूकदारांचे प्रस्ताव आपल्याकडे येतील, असंही जेटच्या व्यवस्थापनाने म्हटलं आहे. स्पाइसजेटचे प्रयत्न आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्याने अनेकांना नैराश्य आलं आहे. या संकटातून कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी स्पाइसजेट कंपनीने जेट एअरवेजचे 500 कर्मचारी आणि 100 वैमानिकांना कामावर घेतलं आहे. जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कामावर घेण्याचं आमचं धोरण आहे, असं स्पाइसजेटने म्हटलं आहे. याआधीच 100 वैमानिक, 200 केबिन कर्मचारी आणि त्यासोबतच 200 तंत्रज्ञांना आम्ही कामावर घेतलं आहे, अशी माहिती स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी दिली. कर्मचाऱ्यांची निदर्शनं जेट एअरवेजच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी दिल्ली आणि मुंबईमध्ये व्यवस्थापनाच्या विरोधात निदर्शनं केली होती. या कंपनीने विमानांची उड्डाणं बंद केल्यानंतर आमचं भवितव्य काय, असा प्रश्न ते विचारत आहेत. =================================================================================== VIDEO : भाजप नेत्याच्या विमानातून उतरवला पैशांनी भरलेला बाॅक्स, अनिल गोटेंचा गंभीर आरोप
  First published: