News18 Lokmat

जेटचे चेअरमन नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीला परदेशात जाण्यापासून रोखलं

आर्थिक संकटामुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परदेशात जाण्यापासून रोखलं. हे दोघंजण मुंबई एअरपोर्टवर आले तेव्हा त्यांच्यावर ही कारवाई झाली.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 08:21 PM IST

जेटचे चेअरमन नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीला परदेशात जाण्यापासून रोखलं

नवी मुंबई, 25 मे : आर्थिक संकटामुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परदेशात जाण्यापासून रोखलं. हे दोघंजण मुंबई एअरपोर्टवर आले तेव्हा त्यांच्यावर ही कारवाई झाली.

नरेश गोयल आणि त्यांची पत्नी दुबईकडे निघालेल्या इमिरेट्स EK 507 या विमानाने प्रवास करणार होते. पण त्यांना प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आली.

विमानातून सामानही उतरवलं

त्यांचं चेक इन केलेलं सामानही विमानातून उतरवण्यात आलं.त्यांचं हे विमान मुंबईहून साडेतीन वाजताच्या सुमाराला टेक ऑफ घेणार होतं.

आर्थिक संकटामुळे बंद कराव्या लागलेल्या जेट एअरवेजची इडीकडून चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडेही त्यांच्या चौकशीची सूत्रं देण्यात आली आहेत. जेटचे संस्थापक नरेश गोयल यांची इतर परदेशी एअरलाइन कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे का याचीही इडी चौकशी करत आहे.

Loading...

कर्जबाजारी जेट एअरवेज

जेट एअरवेजवर 6 हजार 398 कोटींचं कर्ज आहे. या सगळ्या स्थितीमुळे नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी जेट एअरवेजच्या व्यवस्थापक मंडळाचा राजीनामा दिला. नरेस गोयल यांनी 26 वर्षांपूर्वी जेट एअरवेजची स्थापना केली होती. पण आता त्यांनी या एअरलाइनच्या चेअरमनपदाचाही राजीनामा दिला आहे.

कर्मचाऱ्यांचे पगार थकले

ज्या कंपनीच्या एअरलाइनने हजारो प्रवासी टेक ऑफ घ्यायचे त्याच एअरलाइनच्या कंपनीच्या मालकांवर परदेश प्रवास रोखण्याची कारवाई होणं हे दुर्दैवी आहे, असं बोललं जात आहे. जेट एअरवेज कर्जाच्या खाईत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. अशा स्थितीत नरेश गोयल हे मात्र परदेशात जाणार होते. मात्र त्यांना प्रवासाची परवानगी नाकारण्यात आली.

======================================================================================

कोण कसं जिंकलं मलाही जरा बघायचंय, मोदींनी घेतली नव्या खासदारांची 'शाळा' पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2019 08:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...