मुलीचे कपडे काढून तिची व्हिडिओ व्हायरल करण्याऱ्या चौघांना अटक

मुलीचे कपडे काढून तिची व्हिडिओ व्हायरल करण्याऱ्या चौघांना अटक

बिहारच्या जहानाबादमध्ये एका मुलीची छेडछाड केल्याबद्दल आणि तिच्या व्हिडिओ व्हायरल केल्याबद्दल चार मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

  • Share this:

बिहार, 30 एप्रिल : बिहारच्या जहानाबादमध्ये एका मुलीची छेडछाड केल्याबद्दल आणि तिच्या व्हिडिओ व्हायरल केल्याबद्दल चार मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. चार आरोपींना जिहानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ही सर्व मुलं अल्पवयीन आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, या चार मुलांनी त्या मुलीचे कपडे काढण्याचे प्रयत्न केले आणि त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला. आयजी नैय्यर हसनैन हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकार आणखी किती जण सहभागी होते याचा तपास सध्या सुरू आहे.

स्थानिक सुत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातली बाईक ही रवि रंजन याच्या नावे आहे. याच बाईकवरून रविचा एक मित्र मुलीला बाईकवर घेऊन जात असताना त्यांना काही मुलांनी अडवलं आणि मुलीची छेड काढण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही मुलांनी याची व्हिडिओ काढली आणि ती सोशल मीडियावर शेअर केली.

या अल्पवयीन नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2018 03:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading