नवी दिल्ली 25 ऑगस्ट: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही परीक्षा होणार की नाही यावर अजुनही चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु असतांनाच जेईई (JEE) मुख्य आणि नीट (NEET) परीक्षा या ठरलेल्या तारखांनाच होणार असल्याचा निर्वाळा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने National Testing Agency (NTA) दिला आहे. त्यामुळे निर्णयाचा फेरविचार करण्याची शक्यता मावळली आहे असं बोललं जात आहे. या खुलाश्यामुळे आता या परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहेत.
करोनाच्या संकटामुळं या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी होत होती. मात्र राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) 2020 ची जेईई (JEE) मुख्य आणि नीट (NEET) परीक्षा या पूर्वीच्या तारखांप्रमाणेच होतील अशी घोषणा पुन्हा एकदा केली आहे. त्यामुळे आता JEE ची परीक्षा ही 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान तर NEETची परीक्षा ही 13 सप्टेंबरला होणार आहे.
परीक्षा घेऊ नये म्हणून देशभरातून मागणी होत होती. शेवटी हे प्रकरण सुप्रीम कोर्टातही गेलं होतं. कोरोनाचं संकट असतं तरी जीवन थांबू शकत नाही असं म्हणत कोर्टाने परीक्षा थांबवायला नकार दिला होता.
National Testing Agency (NTA) says, JEE (Main) and NEET (UG) exams will be held on the dates announced earlier, which are 1st to 6th September and 13th September respectively. pic.twitter.com/TUwxjxn0tl
कोरोनाचं संकट असतांना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलावणं योग्य नाही. त्याचबरोबर वाहतुकीची व्यवस्थाही झालेली नाही त्यामुळे या परीक्षा लांबणीवर टाका अशी मागणी होत आहे. मात्र केंद्र सरकार फेरविचार करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही.
महाराष्ट्र सरकारनेही या परीक्षा घेऊ नयेत असं मत व्यक्त केलं आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.