Home /News /national /

''एका रात्रीसाठी तुझी पत्नी...'', बदलीच्या बदल्यात अभियंत्याची लाजिरवाणी मागणी, लाईनमननं उचललं टोकाचं पाऊल

''एका रात्रीसाठी तुझी पत्नी...'', बदलीच्या बदल्यात अभियंत्याची लाजिरवाणी मागणी, लाईनमननं उचललं टोकाचं पाऊल

लखीमपूरच्या (Lakhimpur) खीरी येथून एक धक्कादायक बातामी समोर आली आहे. येथील वीज विभागातील एक लाईनमन बदलीची मागणी करत होता. मात्र, कनिष्ठ अभियंत्याने (जेई) त्याच्यासमोर लाजिरवाणी अट घातली.

  लखीमपूर, 11 एप्रिल: लखीमपूरच्या (Lakhimpur) खीरी येथून एक धक्कादायक बातामी समोर आली आहे. येथील वीज विभागातील एक लाईनमन बदलीची मागणी करत होता. मात्र, कनिष्ठ अभियंत्याने (जेई) त्याच्यासमोर लाजिरवाणी अट घातली. जेई म्हणाला की, जेव्हा तो त्याच्या पत्नीला त्याच्या स्वाधीन करेल तेव्हाच लाईनमनची बदली होईल. या अटीमुळे लाईनमन इतका दुखावला गेला की, त्याने घरी येऊन डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. यानंतर ्त्याच्या नातेवाईकांनी त्याला लखीमपूरला घेऊन गेले. तेथून त्याला लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. रविवारी उपचारादरम्यान, त्यांचे निधन झाले. मात्र, मरण्यापूर्वी लाइनमनने जेईविरोधात निवेदन दिले आहे.

  लाईनमनचा आरोप काय 

  लाईनमनने आरोप केला आहे की, जेई आणि त्याच्या दलालाने बदली करण्याच्या बदल्यात पत्नीला मागितले. मी पोलीस ठाण्यातही नंबर देकर तक्रार दिली होती. मात्र, काहीच नाही झाले. दरम्यान, मृताचा परिवार लखनऊ येथे आहे. अद्याप पोलिसांत तक्रार आलेली नाही. तथापि, डीएम महेंद्र बहादूर सिंह यांनी व्हिडिओची दखल घेतली आणि आरोपी जेईला निलंबित करण्याची शिफारस केली. तसेच त्यांची विभागीय चौकशी करण्याचे निर्देश दिले. सायंकाळी उशिरा अधीक्षक अभियंता राम शब्द यांनी आरोपी जेई नागेंद्र कुमार आणि टीजी-2 जगतपाल यांना निलंबित केले आहे.

  50 किमी दूर होती नोकरी, घराजवळ बदलीची होती मागणी
  लखीमपूरच्या पलिया येथे राहणारा गोकुळ यादव (वय-45) वीज विभागात लाईनमन होते. मात्र, त्यांची नोकरी एका वर्षापासून त्यांच्या घराच्या 50 किमी दूर अलीगंज येथे होती. त्याआधी ते महंगापूर येथे कार्यरत होते. तेथे त्यांची ओळख जेई सोबत झाली होती. परिवारासंदर्भात गोकुळ मागील अनेक दिवसांपासून तणावात होते. त्यामुळे त्यांना त्याची बदली आपल्या घराजवळ पलिया येथे करायची होती. यासंदर्भात त्याने अधिकाऱ्यांशी बोलणी केली. मात्र, त्यांची मागणी पूर्ण झाली नाही.
  यानंतर त्यांनी जेईला बदलीची मागणी केली. जेईने बदलीची जबाबदारी घेतली. मात्र, त्याबदल्यात जेई म्हणाला की, तु तुझ्या पत्नीला एका रात्रीसाठी मला आणि माझ्या पत्नीला पाठवून दे. मी तुझी बदली करुन देईल. यानंतर गोकुळ परत आले. त्यांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दिली. मात्र, काहीच कारवाई झाली नाही.
  यानंतर गोकुळ यांनी शनिवारी पलिया येथील आपल्या घरात सायंकाळच्या सुमारास स्वत:वर डिझेल टाकून पेटवून घेतले. परिवारातील सदस्यांनी लखीमपूर येथे घेऊन गेले. मात्र, त्यांची गंभीर झाल्यानंतर त्यांना लखनऊ येथे घेऊन जाण्यात आले. जिथे सकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Electricity, Up crime news

  पुढील बातम्या