27 जुलै: बिहारमध्ये झालेल्या सत्तातंतानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळातही थोडे बदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅबिनेट मंत्रिमंडळात जेडीयूला स्थान मिळू शकते.
बिहारमध्ये जेडीयू-भाजप सत्तेत आल्यानंतर आता केंद्रातही जेडीयूला मंत्रिपदं मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेडीयूला एक कॅबिनेट मंत्रिपद तर एक राज्य मंत्रिपद केंद्रात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय येत्या दोन ते तीन आठवड्यात घेतला जाऊ शकतो.
दरम्यान बिहारमध्ये सत्तातंरानंतर जेडीयू दुपारी अडीच वाजता पाटन्यात प्रेस कॉन्फरन्स होणार आहे.