भाजपला बसणार धक्का; हा मित्र पक्ष NDAतून पडणार बाहेर?

भाजपला बसणार धक्का; हा मित्र पक्ष NDAतून पडणार बाहेर?

NDA Government : एक मित्रपक्ष भाजपतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 जून : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, बिहारमधील भाजपचा मित्र पक्ष असलेला जेडीयु NADतून बाहेर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काही घटनांचा विचार करता नितीश कुमार योग्य वेळेची वाट पाहत असल्याचा तर्क देखील लावला जात आहे. लोकसभेच्या निकालानंतर जेडीयुला एका मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली. पण, जेडीयुनं ऑफर नाकारत NDAसोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. पण, आता पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर ममता बॅनर्जींच्या तृणमुल काँग्रेससाठी रणनीती आखणार आहेत. त्याकरता त्यांनी ममता बॅनर्जींची भेट देखील घेतली. या साऱ्या घडामोडी नितीश कुमार यांच्या परवानगीशिवाय होणं शक्य नाही. शिवाय, ममतांची भेट घेण्यापूर्वी नितीश कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये देखील चर्चा झाली. त्यामुळे भाजपचा कट्टर विरोधक असलेल्या ममता बॅनर्जींच्या प्रचारकरता प्रशांत किशोर यांना नीतीश कुमार यांनी परवानगी दिली का? यावर देखील चर्चा होताना दिसत आहे.

वडिलांशेजारी झोपलेल्या 5 वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण; बलात्कार करून हत्या

काय आहे राजकीय पंडितांचा अंदाज?

नितीश कुमार एक दिवस भाजप, NDAची साथ सोडणार हे नक्की असल्याचं राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. जेष्ठ पत्रकार अरूण अशेष यांच्या म्हणण्यानुसार नितीश कुमार सध्या WAIT AND WATCH या नीतीनुसार चालत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत नितीश कुमार यांची ताकद आणखी वाढलेली असेल असा देखील अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नीतीश कुमार यांना आपल्या राजकीय शक्तीचा अंदाज आलेला आहे.

वडिलांची नोकरी पुन्हा मिळावी यासाठी 13 वर्षाच्या मुलाची नरेंद्र मोदींना 37 पत्रं

लोकसभेसाठी आघाडी

जेडीयु – भाजपनं लोकसभेसाठी आघाडी केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांनी सर्वाधिक जागी विजय देखील मिळवला होता. पण, मंत्रिपदावरून मात्र JD(U) भाजपवर नाराज आहे.

VIDEO: केरळमध्ये पंतप्रधान मोदींची कमळाच्या फुलांनी तुला

First published: June 8, 2019, 12:22 PM IST

ताज्या बातम्या