News18 Lokmat

जयराम ठाकूर होणार हिमाचल प्रदेशचे सहावे मुख्यमंत्री

मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल हे निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे निर्विवाद बहुमत मिळूनही हिमाचलमधील भाजप नेत्यांममध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली होती

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 24, 2017 03:55 PM IST

जयराम ठाकूर होणार हिमाचल प्रदेशचे सहावे मुख्यमंत्री

24 डिसेंबर: हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची माळ आता भाजपचे माजी हिमाचल प्रदेशाध्यक्ष जयराम ठाकूर यांच्या गळ्यात पडणार आहे. हिमाचलमध्ये पहिल्यांदाच मंडी परिसरातली नेता आता मुख्यमंत्री होणार आहेत.

यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजपने हिमाचल प्रदेशमध्ये निर्विवाद बहुमत मिळवलं आहे. आता मुख्यमंत्रिपदी कुणाची निवड होणार याकडे सगळ्यांचच लक्ष लागलं होतं.

पण मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल हे निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे निर्विवाद बहुमत मिळूनही हिमाचलमधील भाजप नेत्यांममध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली होती. त्यात अखेर हिमाचल प्रदेशमधील माजी भाजपाध्यक्ष जयराम ठाकूर यांनी बाजी मारली.

याआधी ठाकूर भाजपच्या राज्यामध्ये ग्रामविकास मंत्री होते. हिमाचलमध्ये कधीच एक सरकार पुन्हा निवडून आलेलं नाही.त्यामुळे यावेळी निवडून आलेल्या जयराम ठाकूर यांच्यासमोर हे राज्य टिकवणं हे एक मोठं आव्हान असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2017 03:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...