जयललितांच्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार

तामिळनाडूच्या स्वर्गीय मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा तामिळनाडू सरकारने केलीय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांनी यासंबंधीची घोषणा केलीय. यासोबतच जयललितांचं राहतं घर 'पोज गार्डन' याचं स्मारक बनवण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलीय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2017 07:11 PM IST

जयललितांच्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार

चेन्नई, 17 ऑगस्ट : तामिळनाडूच्या स्वर्गीय मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा तामिळनाडू सरकारने केलीय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांनी यासंबंधीची घोषणा केलीय. यासोबतच जयललितांचं राहतं घर 'पोज गार्डन' याचं स्मारक बनवण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलीय. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यासंबंधीची मागणी केली होती. किंबहुना या दोन अटींवरच त्यांनी एआयएडीएमकेच्या विलिनकरणास मान्यता दिली होती. ओ. पन्नीरसेल्वम हे जयललितांचे कट्टर समर्थक तसंच पक्षाच्या दुसऱ्या गटाचे नेते आहेत.

जयललितांच्या मृत्यूबाबत त्यांच्या समर्थकांकडून वारंवार शंका उपस्थित होत होत्या. म्हणूनच सरकारने हा निर्णय घेतल्याचं तामिळनाडू सरकारने स्पष्ट केलंय. एका निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखालील आयोग जयललितांच्या मृत्यू प्रकरणाची करेल. या आयोगाच्या अहवालानंतरच याबाबतची पुढची कारवाई केली जाईल, असंही तामिळनाडू सरकारने स्पष्ट केलंय. जयललितांच्या पश्चात एआयएडीएमके पक्षात जयललितांचे समर्थक आणि सुशीलाचे समर्थक सरळ उभी फूट पडली होती. पण सत्ताधारी गटाने जयललिता समर्थकांच्या दोन्ही प्रमुख मागण्या मान्य केल्याने पक्ष विलीनीकरणाचा मार्ग आता मोकळा झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2017 07:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...