मध्यप्रदेश, 26 जानेवारी : इच्छाशक्ती, जिद्द आणि कोणतीही गोष्ट करायची ठरवल्यास तुम्हाला कुणीही हरवू शकत नाहीत. मानसिकदृष्ट्या तुम्ही खंबीर असल्यास कोणताही मोठा अपघात देखील तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. डॉक्टरांनी हार मानली तरीदेखील प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही पुन्हा उभे राहू शकता. अशाच प्रकारची घटना मध्य प्रदेशातील (Madhya Prdesh), भोपाळमधून (Bhopal) समोर आली आहे. येथील 38 वर्षीय जयंत अग्रवाल यांनी हेच दाखवून दिले आहे. मोठ्या अपघातातून (Accident) वाचण्याची शक्यता कमी असताना त्यांनी पुन्हा आपलं आयुष्य नव्यानं सुरु केलं आहे. यामुळे जबरदस्त इच्छशक्तीच्या बळावर काहीही होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले. इतकेच नाही तर अयोध्यापर्यंतची (Ayodhya) 663 किलोमीटरची सायकल यात्रा (Cycling) देखील त्यांनी पूर्ण केली.
जानेवारी 2019 मध्ये जयंत अग्रवाल (Jayant Agarwal) यांच्या गाडीचा भयंकर अपघात (Accident) झाला. या अपघातामध्ये गाडी 20 फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने त्यांच्या शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या शरीरात स्टीलचे रॉड (Steel Rod) आणि बोल्ट टाकण्यात आले. यामुळे त्यांना तीन ऑपरेशन आणि 15 दिवस आयसीयूमध्ये राहावे लागले. मोठ्या प्रमाणात अवयवांचे नुकसान झाल्याने त्यांना या दुखापतीमधून बाहेर येण्यास खूप कालावधी गेला. त्यांच्या खांद्यामध्ये आणि शरीराच्यामागील भागात स्टीलचे रॉड आणि प्लेट बसवण्यात आल्या. परंतु त्यांनी हार न मानता यामधून बाहेर येण्याचा निश्चय केला.
महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांनी त्यांना आयुष्यभर काठीच्या (Stick) आधाराने चालावे लागेल असं सांगितलं होतं. त्यांच्या विविध अवयवांनी काम करणं देखील बंद केलं होतं. पण डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत त्यांना वाचवलं. अनेक महिने त्यांना अंथरुणावर काढावे लागले. परंतु त्यांना त्यांचे मन शांत बसू देत नव्हते. सोशल मीडियावर विविध प्रकारचे प्रेरणायदायक (Inspirational) व्हिडीओ बघत त्यांनी हार न मानण्याचा निश्चय केला. जयंत यांच्या कुटुंबातील आई वडील, पत्नी, मुलगा, लहान भाऊ आणि त्याची पत्नी यांनी जयंत यांच्या ठीक होण्याची आशा सोडून दिली होती.
डॉक्टरांचे मत ठरवले चुकीचे
डॉक्टरांनी त्यांना आयुष्यभर काठीच्या (Stick) आधाराने चालावे लागेल असे सांगितले. परंतु त्यांनी डॉक्टरांचे हे मत खोटे ठरवत आपले आयुष्य पुन्हा पूर्वपदावर आणले. एक दिवस त्यांनी अचानक सकाळी सायकल घेत बाहेर पडले. परंतु शरीराचे मोठं नुकसान झाल्याने शरीर साथ देत नव्हते. पहिल्या दिवशी त्यांना सायकल चालवण्यात खूप अडचणी आल्या. पण त्यांनी हार न मानता 1 वर्ष सराव करत सायकलिंगचा (Cycling) निर्णय घेतला. यानंतर त्यांनी मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये अयोध्यापर्यंतचे (Ayodhya) 663 किलोमीटरचे अंतर सायकलवर पूर्ण करत सर्वांसाठी प्रेरणादायक उदाहरण उभे केले. आयुष्यभर काठीने चालावे लागणार या डॉक्टरांच्या विधानाला देखील चुकीचे ठरवले.
भविष्यात त्यांनी आणखी सायकल यात्रा करण्याचं ठरवलं असून यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ते काश्मीर ते कन्याकुमारी अंतर देखील पूर्ण करणार आहेत. याआधी ते ओरछा पर्यंत सायकल यात्रा करणार असून काश्मीर ते कन्याकुमारी (Kashmir To KanyaKumari) सायकल यात्रेसाठी सराव करत आहेत. यामुळे भविष्यात आणखी तरुणांना आणि याच पद्धतीच्या रुग्णांना प्रेरणा मिळणार आहे. सध्या ते दररोज साडेतीन तासात 100 किलोमीटर सायकल चालवण्याचा सराव करत आहेत. जयंत हे आता भोपाळमधील प्रसिद्ध सायकल क्लबबरोबर देखील जोडले गेले आहेत.
(हे देखील वाचा - आजी रॉक्स बाकी सगळे शॉक, 89व्या वर्षी चालवली नातवाची हुंदई कार! पाहा हा VIDEO)
जयंत यांच्याकडून विविध लोकांना मिळाली प्रेरणा
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य होत असल्याची प्रेरणा यामधून नागरिकांना मिळाली आहे. जयंत यांचे उदाहरण पाहून शहरातील 100 नागरिकांनी सायकल खरेदी केली असून गोविंदपुरा भागातील लहान मुलांनी देखील प्रेरित होऊन सायकल खरेदी केली आहे. यामुळे जयंत यांच्या प्रेरणादायक कहाणीने लहान मुलांना देखील प्रेरणा मिळाली आहे. जयंत यांच्या या प्रेरणादायी उदाहरणाने भारतातील अनेक रुग्णांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळणार आहे. यामुळे आयुष्यात हार न मानण्याचा, निर्धार केल्यास कोणत्याही कठीण परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडू शकता, हाच विश्वास त्यांनी सर्वांना दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayodhya, Madhya pradesh, Road accident