राजकारणातील वादग्रस्त अभिनेत्री करणार भाजप प्रवेश?

उत्तरप्रदेशातील रामपूर मतदारसंघातून या अभिनेत्रीला भाजकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता

News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2019 12:20 PM IST

राजकारणातील वादग्रस्त अभिनेत्री करणार भाजप प्रवेश?

लखनऊ, 25 मार्च : लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आगामी लोकसभेसाठी भाजपने अनेक कलाकार आणि खेळाडूंना संधी दिली आहे. यातच अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या नेत्या जयाप्रदा यासुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अभिनेत्री ते नेता असा प्रवास केलेल्या जया प्रदा यांनी जानेवारीमध्येच खासदार अमर सिंग आपले गॉडफादर असल्याचे म्हटले होते. तसेच जरी मी त्यांना राखी बांधली तरी लोक चर्चा करणे थांबवणार नाहीत असंही त्या म्हणाल्या होत्या.

उत्तर प्रदेशातील रामपूर मतदार संघाच्या माजी खासदार असलेल्या जया प्रदा यांनी पक्षाने निलंबित केल्यानंतर अमर सिंग यांच्यासोबत राष्ट्रीय लोक मंच स्थापन केला होता. त्यांच्या आणि अमरसिंग यांच्या नात्याबद्दलही अनेक चर्चा रंगल्या होत्या.

समाजवादी पार्टीकडून 2004 आणि 2009 मध्ये खासदार झालेल्या जयाप्रदा यांनी भाजप प्रवेश केल्यास त्यांना रामपूर मतदारसंघाची उमेदवारी दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे समाजवादी पार्टी आजम खान यांना त्यांच्याविरोधात तिकीट देऊ शकते. आजम खान आणि जयाप्रदा यांच्यातील वाद नवा नाही. 2009 मध्ये आजम खान यांच्या विरोधानंतरही जयाप्रदा यांना रामपूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं होतं. तर आतापर्यंत ११ पैकी 9 वेळा आजम खान रामपूर विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत.

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी एकत्र निवडणूक लढणार असल्याने आपल्या विरोधात कोणीही आलं तरी काही फरक पडणार नाही असं म्हटलं होतं. त्यांनी सपा-बसपा ला कमीत कमी 70 जागा मिळतील असा विश्वास असल्याचे सांगितले होते.

Loading...

सपा आणि बसपा आघाडीमुळे भाजप हवालदिल झाले आहे. त्यामुळेच भाजपाकडून रामपुरमध्ये वातावरण बिघडवलं जाईल असा आरोपही आजम खान यांनी केला होता.


VIDEO: जेव्हा शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली...!बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 12:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...