• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • भावाला Oxygen Cylinder न मिळाल्याच्या रागात जवानाकडून मंत्र्यांना धमकी, Viral Video नंतर गुन्हा दाखल

भावाला Oxygen Cylinder न मिळाल्याच्या रागात जवानाकडून मंत्र्यांना धमकी, Viral Video नंतर गुन्हा दाखल

'माझ्या लहान भावाला कोरोनाची लागण झाली आहे आणि त्याची प्रकृती गंभीर आहे. मी रेवाडीत शोधलं पण एकाही ठिकाणी मला ऑक्सिजन सिलेंडर मिळाला नाही. गुरुग्राममधून मला 70 हजार रुपयांना ऑक्सिजन सिलेंडर (Oxygen Cylinder) घ्यावा लागला'

  • Share this:
रेवाडी (हरियाणा), 12 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक आपला रोष व्यक्त करत आहेत. आपल्या आप्तजनांना वैद्यकीय सुविधा मिळाव्या यासाठी सामान्य नागरिकांना धडपडावं लागत आहे. हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यात राहणाऱ्या भारतीय लष्करातील एका जवानाच्या कोरोनाबाधित लहान भावालाही ऑक्सिजन (Oxygen) सिलेंडरची गरज होती. तो न मिळाल्याने या जवानाने एक व्हिडीओ शूट केला असून त्यामध्ये गुरुग्रामचे खासदार आणि केंद्रीय मंत्री राव इंद्रजितसिंह (Rao Inderjeet Singh) यांना व त्यांच्या कुटुंबियांना बंदुकीच्या गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रामपुरा पोलीस स्टेशनमध्ये या जवानाविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. हा जवान हरियाणातील रेवाडी (Rewari) जिल्ह्यातील असल्याचं त्याने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. पण त्याचं नाव अद्याप कळू शकलेलं नाही. या व्हिडीओमध्ये त्याने सांगितलं, की माझ्या लहान भावाला कोरोनाची लागण झाली आहे आणि त्याची प्रकृती गंभीर आहे. मी रेवाडीत शोधलं पण एकाही ठिकाणी मला ऑक्सिजन सिलेंडर मिळाला नाही. गुरुग्राममधून मला 70 हजार रुपयांना ऑक्सिजन सिलेंडर (Oxygen Cylinder) घ्यावा लागला. यानंतर त्याने केंद्रीय मंत्री इंद्रजितसिंह यांना गलिच्छ भाषेत शिव्या दिल्या. मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना बंदुकीची गोळी मारून ठार मारण्याची धमकीही या जवानाने या व्हिडीओमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

(वाचा - Proning Explainer : ऑक्सिजन लेव्हल कायम ठेवण्यासाठी पालथं झोपायचं पण नेमकं कसं?)

दरम्यान, मंत्र्यांच्या खासगी सचिवांनी सांगितलं, की या व्यक्तीने गलिच्छ भाषा वापरून मंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. रामपुरा पोलीस स्टेशनमध्ये आयटी कायदा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी म्हणाले,‘या व्हिडीओत त्या व्यक्तीने आपलं नाव सांगितलेलं नाही, पण तो रेवाडी जिल्ह्यातला रहिवासी आहे हे सांगितलं आहे. त्यावरून आम्ही त्याचा शोध घेत आहोत. तसंच व्हिडीओ व्हायरल (Viral Video) करण्यात कोणकोण सहभागी होतं याचाही तपास आम्ही करणार आहोत.’

(वाचा - खळबळजनक! एक-दोन नव्हे तर दिले लशीचे सहा डोस,महिलेच्या तब्येतीवर काय परिणाम झाला?)

केंद्रीय मंत्री इंद्रजितसिंह यांच्या समर्थकांनी मात्र हा व्हिडीओ हे राजकीय षड्यंत्र असल्याचं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढे तपास करतील आणि संबंधितांवर कारवाई करतील. ऑक्सिजनची कमतरता इतकी भासते आहे की सामान्य जनता त्रस्त झाली आहे.
First published: