S M L

दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, सुट्टीवर आलेल्या जवानाचं अपहरण करून निर्घृण हत्या

Sachin Salve | Updated On: Nov 25, 2017 04:09 PM IST

दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, सुट्टीवर आलेल्या जवानाचं अपहरण करून निर्घृण हत्या

25 नोव्हेंबर : जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केलंय. सुट्टीवर असलेल्या एका जवानाचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

पुलवामा इथून सुरक्षा दलाने या जवानाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृत जवानाचं नाव इरफान अहमद डार असून तो कालच आपल्या घरी आला होता. घरी आल्यानंतर काही वेळातच तो बेपत्ता झाला होता. छिन्नविच्छिन्न अवस्थेतील त्याचा मृतदेह आज पुलवामाच्या जंगलात आढळून आला. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

जवानाचे अपहरण करून खून करण्याची या वर्षातील ही दुसरी घटना आहे. याआधी मे महिन्यात भारतीय सैन्यातील लेफ्टनंट पदावरील एका जवानाचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. २२ वर्षांचा हा जवान एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी शोपियान येथील आपल्या घरी आला होता.


Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2017 04:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close