• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Chhattisgarh Breaking News: CRPF जवानांचा सहकारी जवानांवर अंधाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू; चार जवान जखमी

Chhattisgarh Breaking News: CRPF जवानांचा सहकारी जवानांवर अंधाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू; चार जवान जखमी

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) सुकमा (Sukma) येथून एक मोठी बातमी समोर येतेय.

 • Share this:
  छत्तीसगड, 08 नोव्हेंबर: छत्तीसगडमधील (Chhattisgarh) सुकमा (Sukma) येथून एक मोठी बातमी समोर येतेय. जिल्ह्यातील मराईगुडा येथील लिंगानापल्ली कॅम्पमध्ये सीआरपीएफ (CRPF Jawans) जवानाने सहकारी जवानांवर गोळीबार (opened fired ) केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जवान गंभीर जखमी झाले आहे. जखमी जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील मरईगुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लिगम पल्ली सीआरपीएफ 50 बटालियन कॅम्पमध्ये ही घटना घडली. मध्यरात्री 3 वाजून 25 वाजण्याच्या सुमारास जवानानं हा गोळीबार केला आहे. नेमकं काय घडलं रितेश रंजन या जवानानं मध्यरात्री 3 वाजून 25 वाजण्याच्या सुमारास आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार केला आहे. या घटनेत 3 जवानांचा मृत्यू तर 4 जवान जखमी झाले आहेत. या जखमी जवानांवर तात्काळ भद्राचलम (Bhadrachalam Area Hospital) येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मृत्यू झालेल्या जवानांची नावं धनजी राजीब मोंडल राजमणी कुमार यादव जखमी झालेल्या जवानांची नावं धनंजय केआर सिंह धर्मेंद्र के.आर. धर्मात्मा कुमार बग मलाया रंजन महाराणा
  Published by:Pooja Vichare
  First published: